Income Tax संबंधित नवे नियम जाणून घ्या! अन्यथा रिफंड मिळवताना अडचणी येतील.

देशाचा संपूर्ण आर्थिक कारभार योग्य रितीने चालावा यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर भरणे बंधनकारक आहे.  आयकर कायदा 1961 नुसार  60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग करपात्र असल्यास कर रिटर्न भरणे आवश्यक आहे. परंतु भारत सरकार या करांच्या नियमांमध्ये दरवर्षी काही ना काही बदल करीत असते. मग यावर्षीच्या कर नियमांमध्ये नेकमे कोणते बदल करण्यात आले आहेत ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ. Income Tax Rules to Know About

Income Tax Updates
Income Tax Updates

यावर्षी आयकर भरण्याची शेवटची तारीख

2024 या वर्षाचे आयकर म्हणजेच Income Tax Return फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा यावर्षीचा इनकम टॅक्स भरला नसेल तर आजच ऑनलाईन पद्धतीने भरा किंवा तुमच्या सीए सोबत कनेक्ट व्हा आणि त्याला ऑनलाईन फायलींग करायला सांगा. कारण हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. Income Tax Rules to Know About

कलम 80C आणि 80D ची मर्यादा बदलली

पीपीएफ, NSC आणि जीवन विमा प्रीमियममध्ये गुंतवणूक करून करदाते कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूटचा दावा करू शकतात परंतु, आरोग्य क्षेत्रातील डिजिटल पेमेंट आणि बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली गेली आहेत, जी कलम 80डी अंतर्गत वाढीव मर्यादेत वैद्यकीय विम्यावर लागू होते. यासोबतच करदाते कुटुंब आणि ज्येष्ठ नागरिक पालकांसाठी आरोग्य विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमसाठी उच्च कर कपातीचा दावा करू शकतात. Income Tax Rules to Know About

TDS आणि TCSमध्ये महत्त्वाचे बदल

TDS आणि TCSमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पगार नसलेल्या व्यक्तींसाठी नवीन टीडीएस दर आणि स्वयंरोजगार व ई-कॉमर्स व्यवहारांसाठी अतिरिक्त अनुपालन आवश्यकता सामील करण्यात आली आहे. करदात्यांनी टीडीएस प्रमाणपत्र अपडेट केले पाहिजे.  इतकेच नाही तर ITR मध्ये योग्य क्रेडिटचा दावा देखील करणे आवश्यक आहे. Income Tax Rules to Know About

गृहकर्जाच्या व्याजावर जास्त सूट

प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे  कलम 80 EEA अंतर्गत घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजासाठी दीड लाख रुपयांची अतिरिक्त वजावटचा लाभ देण्यात आला असून नवीन गृहकर्जासह करदात्यांना पुरेसा सवलत देण्याचा यामागचा उद्देश आहे. Income Tax Rules to Know About

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WhatsApp Link