बातमी तुमच्या कामाची; असे बना करोडपती SIP च्या मदतीने | Mutual Fund Investment

Mutual fund investment: प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण करोडपती झाले पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. पण आम्ही तुमच्यासाठी असा काही एक प्लॅन घेऊन आलो आहोत की, तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करुन करोडपती बनू शकता. केवळ तुम्ही करीत असलेले आर्थिक नियोजन हे अभ्यासपूर्ण असावे.  SIP मधील बचत तुम्ही किती वर्षांसाठी करणार आहात हे आधिच निश्चित करणे बंधनकारक असते त्यामुळे व्यक्तिशः सेविंगला एक शिस्त लागते आणि 20 ते 25 वर्षांनंतर तुमच्या हातात मोठी रक्कम येते. योग्य रकमेची बचत केल्यास कालांतराने 1 कोटीपर्यंत रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते.

Mutual Fund Investment
Mutual Fund Investment

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे Systematic Investment Plan एक अशी योजना जी तुम्हाला नेमक्या कालावधीसाठी बचत करण्याची मुभा देते आणि तुम्ही बचत केलेल्या पैशांवर उत्तम व्याजासह परतावा देते. SIP मध्ये मासिक 500रुपयांपासून बचत करता येते. ही गुंतवणूक 500 पासून 10 लाखांपर्यंत देखील पोहोचू शकते. SIP म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करीत असते. Mutual fund investment

आर्थिक नियोजनाचे महत्व

आजच्या आपल्या धावपळीच्या आणि कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसण्याच्या काळात आर्थिक नियोजनाला अत्यंत महत्त्व आहे.  ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण आपल्या मिळकतीमधील थोडी का होईना एक रक्कम बचत करणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या भविष्यासाठी ही रक्कम आपल्या कामी येऊ शकते.  

SIP मधील गुंतवणूक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू, तुम्ही जर दर महिना 5000 रुपये SIP मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि दरवर्षी ही गुंतवणूक फक्त 500 रुपयांनी वाढवली आणि तिसऱ्या वर्षी 10 टक्क्यांनी वाढवली अशा पद्धतीने दरवर्षी तुमच्या SIP गुंतवणूकीत तुम्ही पैसे वाढवत राहिलात तर पुढील 20 ते 25 वर्षांत तुमच्याकडे 1 कोटी रुपये जमा होतात. कारण तुम्ही केलेल्या बचतीवर 8 ते 12 टक्के दराने व्याज मिळते. हे व्याज एकअंकी नसते. परंतू गुंतवणूक दाराचा फायदाच असतो. Mutual fund investment

Leave a comment