ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते. आत्ताच जाणून घ्या! | Gratuity Sum Formula

Gratuity formula 2024: खाजगी आणि शासकीय कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहिना एक छोटी रक्कम वजा करुन कंपनी स्वतःकडे ठेवते आणि कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर किंवा किमान 5 वर्षे नोकरी केल्यानंतर नोकरी सोडत असल्यास त्या कर्मचाऱ्यास ती रक्कम दिली जाते. परंतु कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देताना कोणत्या सुत्रानुसार ती दिली जाते याची अनेकांना माहिती नसल्याचे दिसून येते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती सविस्तर लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. लेख संपूर्ण वाचा आणि तुमच्या ग्रॅच्युइटी फंडचे हक्कदार व्हा!

Gratuity News
Gratuity News

ग्रॅच्युइटीसंबंधीत कायदा

कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळावे यासाठी शासकीय संस्था काम करीत असतात, तसेच शासकीय आणि खाजगी कंपन्या कर्मचाऱ्यांना राबवून घेऊ नयेत म्हणून काही शासकीय संस्थांचा वचक देखील या कंपन्यांवर असतो. त्यातच भारतात  payment of gratuity low 1972 साली अस्तित्वात आला. या कायद्यानुसार एखाद्या कंपनीत किमान 10 कर्मचारी दररोज एक वर्ष काम करीत असतील तर त्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे त्यांचे योग्य ते वेतन देणे बंधनकारक आहे. Gratuity formula 2024

ग्रॅच्युइटीचा अधिकार कधी प्राप्त होतो?

कर्मचाऱी नोकरीवर असताना त्याच्या पगारातून ग्रॅच्युइटी म्हणून एक रक्कम वजा केली जाते. तीच रक्कम त्या व्यक्तीला नोकरीची वर्षे पूर्ण केल्यानंतर म्हणजे रिटायरमेंटच्या वेळी मिळते. एखादी व्यक्ती कंपनीत  5 वर्षे काम करीत असेल तरी त्या व्यक्तीस ग्रॅच्युइटीचा अधिकार मिळतो. तसेच  कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्त झाली, किंवा काही खाजगी कारणास्तव नोकरी सोडल्यास परंतु त्या व्यक्तीने ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले असल्यास त्या व्यक्तीस ग्रॅच्युइटीचा संपूर्ण लाभ मिळतो. Gratuity formula 2024

ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते जाणून घ्या!

एकूण उत्पादन रक्कम = शेवटचा पगार x 15/26 x कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या. हेच आपण एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 15/26 म्हणजे काय तर प्रत्येक महिन्यात 4 रविवार असल्याचे पकडले जाते आणि त्याप्रमाणे कामाचे 26 दिवस या सुत्रात पकडण्यात आले आहेत. आणि ग्रॅच्युइटीची तुलना वर्षातील 15 दिवसांच्या आधारावर केली जाते. एखाद्या व्यक्तीचा शेवटचा पगार 75000/- इतका होता, त्या व्यक्तीने एखाद्या संस्थेत 20 वर्षे नोकरी केली.  मग त्या व्याक्तीला 75000×15/26×20 = 865385/- इतकी रक्कम ग्रॅच्युइटी म्हणून दिली जाणे बंधनकारक आहे. Gratuity formula 2024

Leave a comment