भारत सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. अशीच एक शेतकऱ्यांच्या वृद्धापकाशासाठी राबवण्यात येणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024. तुम्ही शेतकरी किंवा मजूर असाल आणि तुमचे नाव प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये नमूद केलेले असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय काय करणे आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana
PM Kisan Maan-Dhan Yojana
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेबद्दल अधिक माहिती
PMKMY योजनेचे लाभार्थी होण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 दरम्याने असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभार्थी म्हणून असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला दरमहा अगदी छोटीशी रक्कम बचत करायची आहे असे केल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. मग कोणत्या वयापासून किती रक्कम बचत केल्यास शासन तुम्हाला पेन्शन देईल हे जाणून घेऊ.
· वयाच्या 18 व्या वर्षी योजनेत सामील झाल्यास – 55 रु दरमहा गुंतवावे लागतील.
· वयाच्या 30 व्या वर्षी योजनेत सामील झाल्यास – 110 रु. दरमहा गुंतवावे लागतील .
· वयाच्या 40 व्या वर्षी योजनेत सामील झाल्यास – 220 रु. दरमहा गुंतवावे लागतील .
याशिवाय प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या इतर अटी अर्जदाराने मान्य केल्यास वयाच्या 60 व्या वर्षापासून त्या लाभार्थ्यास 3000/- रुपयांची पेन्शन सुरु होईल. यानुसार दरमही अगदी छोटीशी रक्कम बचत करुन शेतकरी बांधवांना 36000 रुपयांची वार्षिक पेन्शन सुरु होऊ शकेल. Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana.
·प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://fw.pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरु शकता.
·प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी https://pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1705511 या लिंकवर क्लिक करा.
·प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची मार्गदर्शक तत्वे जाणून घेण्यासाठी https://fw.pmkisan.gov.in/Documents/PM-KMY%20-%20Operational%20Guidelines.pdf या लिंकवर क्लिक करा.
या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून तुम्ही तुमच्या नजदिकच्या CSC सेंटरवर जाऊन विचारपूस करु शकता.