Tata -Vivo Update: VIVO कंपनीचे 51% शेअर्स घेऊन TATA कंपनी बनवणार स्मार्टफोन्स

भारतात औद्योगिक विश्वात अत्यंत विश्वासाने ज्या कंपनीचे नाव घेतले जाते ती कंपनी म्हणजे TATA कंपनी. गाड्यांपासून ते मिठ निर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात टाटा कंपनीने स्वतःची छाप उमटवली आहे. आणि आता मोबाईल निर्मितीत टाटा कंपनी अग्रेसर बनू पाहत आहे. चला तर मग जाणून घेऊ टाटा कंपनीचा हा नव्या टेक्नॉलॉजीच्या दिशेने सुरु झालेला हा महत्वाकांक्षी प्रवास. Tata -Vivo Update

Tata Vivo IPL
Tata Vivo IPL

टाटा कंपनी 2013 पासूनच मोबाईल नेटवर्ग आणि हँडसेट क्षेत्रात काम करीत आहे. आता या कंपनीने स्मार्टफोन बनविण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. म्हणूनच टाटा कंपनीने चीनच्या Vivo या सर्वात मोठ्या स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीचे 51% शेअर्स विकत घेतले आहेत. तसा करार देखील करण्यात आला आहे. भारत सरकारने आआधीच चीनी कंपन्यांना स्थानिक कंपन्यांसोबत भागीदारी करण्याबाबत अट घातली होती. त्यामुळे चीनची Vivo कंपनी विश्वासू भागिदाराच्या शोधात होती आणि आता त्याचाच एक भाग म्हणजे टाटा कंपनीसोबत Vivo कंपनीने केलेला करार. आता काही दिवसांतच आपण टाटा कंपनीचे दर्जेदार स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहोत. गाड्यांच्या क्षेत्रात अव्वल असलेल्या टाटा कंपनीने स्मार्टफोन क्षेत्रात देखील स्वतःचा ठसा उमटवण्याची ही सुरुवात असल्याचे अनेकांचे मत आहे. Tata -Vivo Update  

TATA ही भारतात iPhone बनवणारी पहिली कंपनी

2023 मध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही भारतात iPhone बनवणारी पहिली कंपनी आहे. चीनमधील तैवानच्या विट्रॉनचा प्लॅंट $125 मिलियनला टाटा कंपनीने खरेदी केला आहे. इतकेच नेहीत तर सध्या पेगाट्रॉनसोबत त्यांचा चेन्नईमधील आयफोनचा प्लँट खरेदी करण्याबाबत बोलणी सुरु आहेत. तसेच टाटा इलेक्ट्रॉनिक्स तामुळनाडूमधील होसूर येथे आयफोन असेंबलिंग प्लँट बनवत आहेत. Tata -Vivo Update  

Leave a comment