फक्त जमिनीचा सातबारा पाहू नका तर हे सुद्धा पहा.

जर तुमची प्रॉपर्टी असेल मग ती कुठेही असू द्या. तुमची गावांमध्ये किंवा शहरांमध्ये प्रॉपर्टी असेल, कुठेही जर प्लॉट असेल, घर असेल, जमीन असेल किंवा शेतजमीन असेल तर हा लेख महत्वपूर्ण ठरणार आहे.आजकालच्या जगामध्ये प्रॉपर्टी बाबतचे फ्रॉड भरपूर वाढलेले आहेत आणि त्याच्यावरती लक्ष कसे ठेवायचे? आपली प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? त्याचबरोबर हे फ्रॉड वाचवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन कसे ट्रॅक करू शकता? त्यामध्ये कसे आपल्या मूळ मालमत्तेवरती लक्ष ठेवायचे? याच्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. 

७१२ सोबत ‘हे’ सुद्धा पहा! फसवणुकीपासून वाचाल!
७१२ सोबत ‘हे’ सुद्धा पहा! फसवणुकीपासून वाचाल!

आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळते की, माझ्या भावाने माझी जमीन मला न माहीत होता  त्याच्या नावावर केली किंवा जवळच्या नातेवाईकांनी माझ्या जमिनीवरती कब्जा केला आणि त्याच्या नावाने ती प्रॉपर्टी करून घेतली गेली. अशा प्रकारचे भरपूर काही फ्रॉड होतात त्यावरती आळा घालण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे 

या वेबसाईटवरती तुम्हाला विनास्वाक्षरीचा सातबारा पाहायचा आहे – https://bhulekh.mahabhumi.gov.in . हा तुम्हाला लीगल कामासाठी वापरता येणार नाही. प्रॉपर सातबारा जर घ्यायचा असेल तर पंधरा रुपयाला एक सातबारा पडतो. तो लीगल कामासाठी आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता. सातबारा ओपन झाल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला दिसत असेल की प्रलंबित फेरफार हे लाल अक्षरांनी नमूद केलं आहे. आता प्रलंबित फेरफार म्हणजे काय?

तर या सातबाराच्या जमिनीवरती काहीतरी व्यवहार झालेला आहे आणि तो व्यवहाराचा फेरफार हा प्रलंबित आहे. तो कशासाठी? तर कुणाचे ऑब्जेक्शन तर येणार नाही ना. यासाठी 15 दिवस सातबारा वरती कुठलाही व्यवहार होण्याच्या अगोदर प्रलंबित फेरफार असतो आणि ती नोटीस जाहीर केली जाते. ती नोटीस कुठे पाहायची? त्यासाठी झाली लिंक दिलेली आहे – https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr   

ही वेबसाईट तुम्हाला ओपन केल्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव सेलेक्ट करायचा आहे. तुमच्या गावांमध्ये कुठल्या सर्वे नंबर वरती काय नोटीस आलेली आहे? काय व्यवहार झाले आहेत? हे समजते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

पंधरा दिवसानंतर ह्या सातबारामध्ये बदल केला जातो. हे पंधरा दिवस कशासाठी दिले जाते? तर कुठल्याही शेतकऱ्यांचा व्यवहार चुकीच्या दृष्टीने तर  झाला नाही ना? यावरती कुणाचं काय ऑब्जेक्शन तर नाहीये? त्यासाठी हे पंधरा दिवसाचे नोटीस दिले जाते. त्याच्यामुळे ही नोटीस आणि सातबारा वरती प्रलंबित फेरफार हे तपासून पाहणे खूप गरजेचे आहे.

आता जर तुम्हाला हा व्यवहार नेमका काय झालेला आहे, ते शॉर्टकट मध्ये असे दिलेले असते की, “खरेदी देण्यात आलेले आहेत.” परंतु जर डिटेल मध्ये तुम्हाला पाहायचा असेल तर इथे तुम्ही ही नमुना नंबर 9 ची ही नोटीस तुम्ही पूर्ण वाचू शकता आणि त्या सातबारा वरती कुठला व्यवहार झालेला आहे. हे सविस्तरपणे समजते.

तुमचा शहरी भागातला सातबारा यासारखाच असतो किंबहुना तुम्ही शहरांमध्ये कुठल्याही ठिकाणी असाल तर त्यामध्ये प्रॉपर्टी नंबर, सर्वे नंबर किंवा गट नंबर असतो. जेवढे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन होतात. त्याची सर्व इंट्री तुम्हाला फेरफारच्या नोटीसमध्ये दिसते. तर हे तपासून पाहणे  महत्त्वाचं असणार आहे. जास्तीत जास्त शहरी भागामध्ये एक प्लॉट दोघा तिघांना विकणे, असे गैरव्यवहार होत राहतात. त्यामुळे पंधरा दिवसातून एक वेळेस ही ‘आपली चावडी’ वेबसाईट आणि ‘आपला सातबारा’ पाहणे गरजेचे आहे. प्रलंबित फेरफारची पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही ‘आपली चावडी’ या  वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या गोष्टी तपासून पहायच्या आहेत. जेणेकरून तुमच्या प्रॉपर्टी वरती इतर कोणी  व्यवहार करू नये. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्थायी प्रॉपर्टी वरती लक्ष ठेवू शकता.

Leave a comment