महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी!! अर्ज कसा व कुठे करायचा, पात्रता, कागदपत्रे याची संपूर्ण माहिती

सरकारकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यातच आता गरीब व गरजू महिलांना शासनाकडून मोफत पिठाची गिरणी मिळत आहे म्हणजेच महिलांना 100% अनुदानावरती पिठाची गिरणी सरकार करून देण्यात येत आहे आणि त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत तर आपण या योजनेची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत .जसे की मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कुठे करावा? या योजनेत कोणकोणत्या महिला अर्ज करू शकतात? कागदपत्रे काय लागतील पात्रता काय असणार आहे? याची माहिती घेऊ.

Floor Mill Machine Yojana
Floor Mill Machine Yojana

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना शासनाकडून 100% अनुदानावरती राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे. ही योजना खास करून ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांसाठी राबवली जात आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल व महिलांना घरी बसून चांगलं उत्पन्न घेता येईल.आणि ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम करणे, या योजनेचा मुख्य उद्देश आहे.कारण या व्यवसायातून म्हणजेच पिठाच्या गिरणी पासून गिरणीपासून उत्पन्न चांगले मिळते आणि हा व्यवसाय महिला सहज करू शकतात. 

पात्रता :-

1)या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. 2)सर्व गरीब व गरीब महिला या योजनेसाठी पात्र आहेत. 3)या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली किंवा महिलांना घेता येईल.

4)अर्ज करणारी मुलगी किंवा महिला बारावी शिकलेली पाहिजे. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

5)अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी पाहिजे.

कागदपत्रे :-

1)अर्जाचा विहीत नमुना 

2)शिक्षणा संबंधित प्रमाणपत्र 

3)व्यवसायासाठी जागेचा उतारा (घराचा आठ अ उतारा) 

 4)उत्पन्नाचा दाखला ( तलाठी किंवा तहसीलदार यांचा) 5)आधार कार्ड 

6) बँकेचे पासबुक(पहिल्या पानाचे झेरॉक्स)

7)रहिवासी दाखला (ग्रामपंचायतीचा)

8)लाईट बिल (व्यवसायासाठी  वीज लागेल)

अर्ज कसा व कुठे करावा :-

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. हा  अर्जाचा नमुना  तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये मिळून जाईल किंवा या अर्जाची लिंक इथून डाऊनलोड करू शकता.

हा अर्ज भरल्यानंतर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जी  कागदपत्रे आहेत त्यांचे झेरॉक्स प्रत तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर आणि कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला तुमचे तालुक्यातील गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे. जेवढे पण अर्ज त्या ठिकाणी जमा होतील त्यातून ज्यांचे अर्ज व कागदपत्रे बरोबर व योग्य असतील, त्या महिला लाभार्थ्यांची निवड महिला व बाल विकास समितीद्वारा केले जाईल व लाभ मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना या ठिकाणी कळविण्यात येणार आहे. 

तर अशाप्रकारे  मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ  महिला घेऊ शकतात व स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुदृढ करू शकता.

Leave a comment