Laptop OR Desktop ? काय घेतला पाहिजे ? 7 Checklist

मित्रांनो आपल्याला नेहमी पडलेला प्रश्न असतो जेव्हा आपल्याला लॅपटॉप बदलायचं असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की लॅपटॉप घ्यायचा कुठला? मग जेव्हा बजेट वाढत वाढत जाते तेव्हा वाटते की याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तर केवढा भारी Desktop आपण बिल्ड करू शकतो? मग Laptop or desktop ? काय घेणे योग्य ? तर चला मित्रांनो आपण यावर दोघांचे फायदे तोटे जाणून घेऊ आणि मग निष्कर्ष काढूया की काय घेणे फायद्याचे आहे.

Laptop Vs Desktop

लॅपटॉप चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पोर्टेबिलिटी. जर आपल्याला वेगळ्या ठिकाणी कम्प्युटरची गरज पडत असेल तर एनीटाईम लॅपटॉपच बेस्ट. पण portability व्यतिरिक्त काही गोष्टी आणखी आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत . चला तर मग पाहूया .

1. PERFORMANCE :

जर का आपण 50000 मध्ये एखाद्या लॅपटॉप घेत असो आणि दुसऱ्या बाजूला 50000 मध्ये जर का पीसी बिल्ड करत असू तर 99 टक्के चान्सेस आहेत की आपला पीसी हा खूप चांगला परफॉर्मन्स देईल.

बेस्ट ऑफ मध्ये कूलिंग फॅन असतात हे मोठे असतात आणि जास्त प्रमाणात असतात पण लॅपटॉप मध्ये छोटे फॅन्स असतात जेवढे जास्त प्रमाणात कुलिंग होईल तेवढेच मशीन थंड राहील आणि चांगले परफॉर्म करेल तर हे आपल्याला डेस्कटॉप मध्ये बघायला मिळते पण त्याच विपरीत लॅपटॉप मध्ये कुलिंग पॅड हे खूप छोटे असतात त्यामुळे जर का लॅपटॉप जास्त वेळ गरम राहिला तर तो हँग सुद्धा होऊ शकतो.

2. STORAGE :

लॅपटॉप मध्ये स्टोरेज हे सहसा २.५इंच HDD असते. आणि डेस्कटॉप मध्ये 3.5 इंच HDD असते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

3. GRAPHICS CARD :

लॅपटॉप मध्ये आपल्याला इंटिग्रेटेड आणि डेडिकेटेड असे दोन्ही सुद्धा ग्राफिक कार्ड आपल्याला मिळू शकतात पण त्याचा साईज छोटा असतो तेच जर का डेस्कटॉप मध्ये आपण बघितले तर तिथे अख्खा सेक्शन ग्राफिक्स कार्ड साठी दिलेला असतो. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड असल्यामुळे परफॉर्मन्स कॉलिटी ही खूप उत्तम लेवलची असते

4. WARRANTY :

जर का लॅपटॉप आपण ओपन केला तर त्याची वॉरंटी गेली. पण दुसऱ्या ठिकाणी डेस्कटॉप म्हणजे आपण सगळ्या वस्तू असेंबल करतो. त्यामुळे वॉरंटी ही त्या इंडिव्हिज्युअल पार्ट्सची असते. त्यामुळे वॉरंटी जाण्याचा प्रश्नच नाही. पाहिजे ते पार्ट्स आपण काढू शकतो पाहिजे तर पार्ट्स आपण लावू शकतो.

5. UPGRADES :

आपण जर का डेस्कटॉप बनवून घेतला तर आपण पाहिजे ते बदल त्यामध्ये करू शकतो जशी नवीन टेक्नॉलॉजी आली तसेच ग्राफिक्स कार्ड रॅम किंवा अन्य पार्ट्स आपण पाहिजे तेव्हा बदलू शकतो पण लॅपटॉपचे तसे नाही.

लॅपटॉप चा फायदा एवढाच आहे की इथे आपल्याला वेगवेगळे पार्ट्स असेंबल करायची गरज नाही हे आपल्याला सेट करूनच मिळालेले असते.

6. POWER CONSUMPTION :

डेस्कटॉप हे खूप जास्त पावर कंजूम करते. तेच लॅपटॉप म्हणले तर डेस्कटॉप च्या कम्पॅरिझन मध्ये १० टक्केच पावर कंजूम करते.

सगळ्यात मेन म्हणजे जर का इलेक्ट्रिसिटी गेली तर आपला डेस्कटॉप डायरेक्ट बंद पडणार पण लॅपटॉप च तसे नाही. तर आपल्याला डेस्कटॉप साठी एक यूपीएस पण घ्यावे लागणार.

7. Durability :

लॅपटॉप हा कमी काळ टिकतो जर का पण त्याला डेस्कटॉप सोबत कम्पेअर केले तर. कारण काळानुसार नवीन नवीन अपडेट सॉफ्टवेअर मध्ये येत राहतात आणि त्या अपडेटेड सॉफ्टवेअर साठी अपडेट हार्डवेअर सुद्धा लागते आणि लॅपटॉप हा एकदाच सेट केलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण अपग्रेड करणे हार्डवेअर मध्ये हे अशक्य असते तेच आपण डेस्कटॉप मध्ये पाहिजे तसा काळानुसार बदल करू शकतो हा याचा फायदा आहे.

चला टेक्नॉलॉजी ऑफ ग्रेड याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये आणि त्यांना बिना झंझट करतात एक मशीन बनवायचा असेल तर त्यांच्यासाठी लॅपटॉप चांगला आहे. पण ज्याला हे नकोय जो वेगवेगळ्या कंपोनेंट्स च्या बाबतीत माहिती घेऊन स्वतःच बिल्ड करू इच्छित आहे त्यांनी डेस्कटॉप प्रेफर करू शकतो.

व्हॅल्यू फॉर मनी हा डेस्कटॉपच असतो.

Leave a comment