HDD Vs SSD काय आहे दोघांत फरक ?

HDD- HARD DISC DRIVE

ही खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये एक फिजिकल मोविंग पार्ट असतो ज्याला आपण म्हणतो PLATTER. तर हा प्लॅटर सतत फिरत असतो आणि त्याच्यावरती एक नीडल असते ती नीडल डेटा रीड आणि राईट करत असते. म्हणजेच एका ग्रामोफोन सारखा. हा प्लॅटर जेवढा फास्ट फिरेल तेवढा जास्त डेटा प्रोसेस होईल, त्यामुळे डेटा प्रोसेसिंग च्या वेळी यातून आवाज सुद्धा येतो. या प्लॅटरचा स्पीड आर पी एम मध्ये असतो. 5400RPM ,7200RPM etc.

याची किंमत SSD पेक्षा कमी असते पण याचा साईज हा कंपॅरिटीवली SSD पेक्षा जास्त असतो.

SSD -SOLID STATE DRIVE

जसे आपण हार्ड डिस्क ड्राइव्ह मध्ये बघितले की प्लेटेड असतो जो फिरत असतो त्याच्यावरती नीडल असते. तर SSD मध्ये तसे काहीच नसते. यामुळे याचा आकारही छोटा असतो. यामध्ये छोट्या छोट्या चीप असतात ज्या मेमरी चिप असतात. हे स्टोरेज करण्याचं काम करतात. जेवढ्या जास्त चीप तेवढा जास्त डेटा स्टोअर आणि प्रोसेस होऊ शकतो. याच्यातून आवाज सुद्धा नाहीये. याचा स्पीड हार्ड डिस्क ड्राइव पेक्षा खूप जास्त असतो. SSD हे HDD पेक्षा महाग असते जवळपास दुप्पटच रक्कम असते सेम डेटा साठी.

आपण कधी HDD आणि कधी SSD घेतले पाहिजे?

जेव्हा आपल्याला डेटा स्टोअर करायचा असतो म्हणजे जसे की मुव्हीज सिरीज किंवा असं कोणताही डेटा जो डाऊनलोड करून ठेवला आणि आपल्या नंतर तो पुन्हा बघायचा असेल तर त्यावेळी HDD आपण प्रेफर केले पाहिजे.

जेव्हा आपल्याला एप्लीकेशन्स भरपूर रन करायचे असतील म्हणजे कुठलेही सॉफ्टवेअर किंवा आणखी काही तर त्यावेळी आपण डेटा प्रोसेसिंग ला महत्व देतो तर तेव्हा SSD ची आपण निवड केली पाहिजे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

जर का आपण पीसी बिल्ड करत असू तर तेव्हा दोघांचे कॉम्बिनेशन जर का आपण ठेवू शकत असो तर ते जास्त फायद्याचे आहे म्हणजे जर का जास्त डेटा स्टोअर करण्यासाठी HDD आणि जास्त एप्लीकेशन प्रोसेसिंग फास्ट होण्यासाठी SSD कॉम्बिनेशन सुद्धा आपण करू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top