RBI MPC Meeting: शक्तीकांत दास यांच्या टीमने घेतले 5 मोठे निर्णय, तुमच्यावर होणार थेट परिणाम!

RBI MPC Meeting: भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे. या भारतीय रिझर्व्ह बँकेची 51 वी MPC बैठक 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली. सेंट्रल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर केले. ते 5 निर्णय कोणते आहेत ज्यांचा सर्वसामान्यांवर आणि देशाच्या आर्थिक व्यवहारांवर कोणकोमते परिणाम होऊ शकतात हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरनी कर्जासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. RBI च्या पतधोरण समितीने सलग 10व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. समितीने 51 व्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यानंतर रेपो दर 6.50% वर राहील. तर, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम आहे. बँक दर 6.75 टक्के कायम आहे. यावेळी 6 पैकी 5 सदस्यांनी एकमताने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI MPC Meeting

2- RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी GDP अंदाज 7.2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. Q3 साठी GDP अंदाज 7.3 टक्क्यांवरून 7.4 टक्के, Q4 साठी 7.2 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीसाठी GDP अंदाज 7.3 टक्के ठेवण्यात आला आहे. RBI MPC Meeting

3- FY25 साठी किरकोळ महागाईचा अंदाज 4.5 टक्के राखला गेला आहे. तो व्यवसाय वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 4.1 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 4.8 टक्के, चौथ्या तिमाहीसाठी 4.2 टक्के आणि व्यावसायिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीसाठी 4.3 टक्के ठेवण्यात आला आहे. RBI MPC Meeting

4- याशिवाय, पॉलिसीची भूमिका विथड्रॉवल ऑफ ॲकोमोडेशनवरून न्यूट्रलमध्ये बदलण्यात आली आहे. याचा अर्थ आगामी निर्णयांमध्ये थोडी शिथिलता दिली जाऊ शकते. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन धोरण दर वाढवण्याची किंवा कमी करण्याची लवचिकता RBI कडे असेल. म्हणजे आगामी बैठकीत व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आणखी वाढली आहे. RBI MPC Meeting

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

5- सेंट्रल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की खाद्यपदार्थ आणि किमतींमुळे महागाई वाढू शकते. जागतिक संकट आणि प्रतिकूल हवामानामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. याशिवाय वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाई वाढण्याचा धोका आहे. जगातील इतर चलनांच्या तुलनेत रुपयातील चढउतार कमी आहेत.

Leave a comment