प्रधानमंत्री सूर्य घर मुक्त बिजली योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली. भारतातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज पुरवणे हा यामागचा उद्देश आहे. योजनेंतर्गत, घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल, जे सौर पॅनेलच्या किंमतीच्या 40% पर्यंत असेल. या योजनेचा देशभरातील सुमारे 1 कोटी कुटुंबांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
PM सूर्य घर मोफत बिजली योजना
प्रमुख मुद्दे
- उद्दिष्टः सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, विजेचा खर्च कमी करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांना विजेच्या बिलांवर बचत करण्यास मदत करणे.
- अनुदान सहाय्यः सरासरी मासिक वीज वापराच्या आधारे 1-3 किलोवॅटपर्यंतच्या सौर पॅनेलसाठी 30,000 ते 78,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल.
- फायदेः एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल, ज्यामुळे वार्षिक सुमारे 18,000 कोटी रुपयांची बचत होईल. याशिवाय, उर्वरित वीज विकूनही उत्पन्न मिळवता येते.
पात्रता
भारतीय नागरिकत्व, छतावरील घर, वैध वीज जोडणी आणि इतर कोणत्याही अनुदानाचा आगाऊ लाभ घेतलेला नाही. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि सरकारी नोकरीमध्ये कोणीही सदस्य नसावा. सर्व श्रेणीतील लोक या योजनेसाठी पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डाशी जोडणे आवश्यक आहे.
योजना
या योजनेद्वारे, सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे, विजेच्या बिलात बचत करणे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे केवळ नागरिकांचा विजेचा खर्च वाचणार नाही तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ आणि नवीकरणीय उर्जेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून विजेच्या बिलात बचत करण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील, ज्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढेल.
किती युनिट इलेक्ट्रिसिटी साठी किती किलोमीटरचा प्लांट तुम्हाला लावावा लागेल आणि त्यावर किती सबसिडी मिळेल हे चेक करण्यासाठी “Subsidy Structure” वरती क्लिक करू शकता. यामध्ये तुम्हाला किती किलो वॅट मागे किती सबसिडी याचे सगळे गणित दिलेले आहे. PM Surya Yojna या वेबसाईट वरती तुम्ही इंडिया मधून कुठून पण अप्लाय करू शकता या योजनेसाठी.
आता तुम्हाला सोलर साठी अप्लाय करण्यासाठी “apply for rooftop solar” वरती क्लिक करायचे आहे.
नोंदणी कशी करायची?
- 1. state, district, electricity distribution company / utility, consumer account number हे डिटेल टाकायचे आहेत.
- 2. वरची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल.
- 3. फोन नंबर टाका त्यानंतर “click to send otp” दाबा.
- 4. ओटीपी आल्यानंतर मोबाईल ओटीपी टाका. नंतर कॅपच्या टाका
- 5. Submit.
- 6. Login करा
लॉगिन केल्यानंतर “apply for rooftop solar” च पेज ओपन होईल. “proceed” क्लिक करा.
भरण्यासाठी तीन स्टेप आहेत खाली दिलेल्या प्रमाणे
- 1. application details
- 2. upload documents
- 3. final submission to distribution company / utility.
- 4. submit bank details for subsidy.
1. Application Details
i) details of applicants:
लाईट बिल वरती नाव जे आहे ते टाकायचे आहे, कास्ट कॅटेगरी, ऍड्रेस, गाव, पिन कोड राज्य ही सगळी माहिती टाकायची आहे.
ii) electricity distribution company details:
यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी ची स्टेट, कंपनीचे नाव, तुमची डिव्हिजन, सब डिव्हिजन, कंजूमर अकाउंट नंबर, आणि सैंक्शन लोड ही माहिती भरायची आहे
iiii) solar rooftop details
कॅटेगरीमध्ये तुम्ही रेसिडेन्शिअल असाल तर रेसिडेन्शिअल निवडू शकता.
iv) proposed solar plant capacity
तुम्हाला किती वीज गरजेचे आहे साधारण तुमचा विजेची गरज किती वॅट आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती किलो वॅट कॅपॅसिटी चा प्लांट लागेल ते तुम्ही टाका.
v) तुमची लोकेशन सिलेक्ट करा.
vi) save and next.
2. Upload Document
मागच्या सहा महिन्यातलं कुठलंही एक इलेक्ट्रिसिटी बिल तिथे अपलोड करा 500 kb पर्यंत.
3. final submit क्लिक करा
4. submit bank details for subsidy वर क्लिक करा.
“go to bank details” वर क्लिक करा.
आता इथे बँकेचे नाव, IFSC code, खातेधारकाचे नाव, बँक अकाउंट नंबर, बँक पासबुक/ स्टेटमेंट/चेक ची एक फाईल 2mb पेक्षा कमी साईज असलेली अपलोड करा.
क्लिक “submit to MNRE”
वरच्या पट्टी वरती तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल
या संकेतस्थळावर करा अर्ज – pmsuryaghar.gov.in