महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे 1 हजार 500 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहेत. आता लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे. त्याचं कारण म्हणजे आता पुढच्या महिन्याच्या अखेरीपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळी म्हटलं की खर्च आलाच. त्यामुळे पुढचा हप्ता कधी मिळतोय याची आस लाडक्या बहिणींना लागली आहे. तर दुसरीकडे याचाच विचार करता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. चला तर मग नेमकी काय घोषणा केली आहे, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
2 महिन्याचे एकदम पैसे
दिवाळी म्हटलं की, खरेदी गोड फराळ हे आलेच. त्यामुळे दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. त्यामुळे लाडक्या बहिणींनाही त्यांची दिवाळी गोड साजरी करता यावी यासाठी सरकारने एक निर्णय घेतला आहे. याचीच घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार यांनी लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकदम खात्यावर जमा करण्याची घोषणा केली आहे. यामुळे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दिवाळीच्या मुहूर्तावर मिळणार आहेत. यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.
कधी मिळणार हप्त्याचे पैसे?
अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकाच वेळी खात्यात जमा करण्याचे घोषणा केली, असून ते पैसे कधी जमा होणार आहे याचीही तारीख जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहेत. एकंदरीत महिलांना दिवाळीच्या मुहूर्तावर हे पैसे देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की महिलांनी हे पैसे स्वतःसाठी वापरावे आणि सन्मानाने राहावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्य सरकारकडून ही योजना महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या दीड हजार रुपयांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार आहेत.