Direct Tax Vivad Se Vishwas Scheme केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिकृतपणे ‘डायरेक्ट टॅक्स विवाद से विश्वास स्किम (DTVSV)’ ची घोषणा केली आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे. या योजनेंतर्गत आयकर संबंधित वाद लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2024 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की त्या लवकरच आयकर विवाद सोडवण्यासाठी एक योजना सादर करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. तीच ही योजना.
2020 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती
हा या योजनेचा हा दुसरा टप्पा आहे असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 2020 मध्येही ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे 1 लाख करदात्यांनी त्याचा लाभ घेतला आणि सरकारला सुमारे 75,000 कोटी रुपयांचा कर प्राप्त झाला. खरं तर, केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकार लवकरच आयकर विवादांवर तोडगा काढण्यासाठी एक योजना आणणार आहे. Direct Tax Vivad Se Vishwas Scheme,
DTVSV योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची ही योजना वित्त कायद्यांतर्गत आणण्यात आली आहे. DTVSV योजनेच्या नियमांबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. PIB नुसार, 31 डिसेंबर 2024 पूर्वी घोषणापत्र दाखल करणाऱ्यांना हा लाभ दिला जाईल. त्यानंतर दाखल करणाऱ्यांना कमी सेटलमेंट रक्कम दिली जाईल. Direct Tax Vivad Se Vishwas Scheme,
DTVSV योजनेअंतर्गत 4 फॉर्म जारी करण्यात आले आहेत.
फॉर्म 1 – घोषणाकर्त्याद्वारे घोषणा आणि हमीपत्र दाखल करणे
फॉर्म 2 – प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रमाणपत्रासाठी
फॉर्म 3 – या फॉर्म अंतर्गत घोषित करता पेमेंट माहिती देईल
फॉर्म 4 – या फॉर्ममध्ये, कर थकबाकीच्या पूर्ण आणि अंतिम सेटलमेंटची माहिती प्राधिकरणाद्वारे दिली जाईल.
नवीन DTVSV योजना
नवीन DTVSV योजनेत अशी तरतूद आहे की प्रत्येक वादासाठी फॉर्म-1 स्वतंत्रपणे दाखल केला जाईल, जर अपीलकर्ता आणि आयकर प्राधिकरण या दोघांनी त्याच आदेशाच्या संदर्भात अपील दाखल केले असेल.
देयकाची माहिती फॉर्म-3 मध्ये द्यायची आहे आणि अपील, हरकत, अर्ज, रिट याचिका, विशेष रजा याचिका किंवा दावा मागे घेण्याच्या पुराव्यासह प्राधिकरणाला द्यायची आहे.
घोषणा करणाऱ्याला www.incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर फॉर्म-1 आणि फॉर्म-3 सबमिट करावा लागेल. खटल्यांच्या व्यवस्थापनासाठी सरकारचा हा आणखी एक उपक्रम आहे. Direct Tax Vivad Se Vishwas Scheme,