गुगलचे हे फ्री कोर्स करुन तुम्ही मिळवू शकता उत्तम पगाराची नोकरी

मित्रांनो तुम्ही एखाद्या उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहोत. दिनांक 4 सप्टेंबर, 1998 रोजी लॅरी पेज, सर्जी ब्रिन या दोघांनी गुगल या कंपनीची स्थापना केली. सुंदर पिचाई हे एक भारतीय असून गुगलचे CEO आहेत. ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. गुगल त्याच्या प्लॅटफॉर्मवरून जगभरातील तरुणांसाठी उत्तमोत्तम कोर्सेस उपलब्ध करून देत आहे. त्यापैकीच काही कोर्सेसच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Google Free Courses
Google Free Courses

गुगलचे फ्री कोर्सेस

https://grow.google/intl/en_in/learn-skills/ / गुगलच्या या लिंकवर जाऊन तुम्ही विविध कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने आणि अगदी मोफत शिकू शकता. त्यातील Google Digital marketing course  आणि Google Digital marketing course  हे दोन कोर्स असे आहेत ज्याच्या मदतीने तुमचे Resume  अपडेटतर होईलच परंतु त्यातून तुम्हाला खूप जास्त नॉलेज मिळेल. गुगलने उपलब्ध करुन दिलेले कोर्सेस हे Beginner, Intermediate, Advanced या तिन्ही पातळ्यांवर आहेत. त्यामुळे शिकणाऱ्याला सहज समजू शकतात. व्हिडिओच्या स्वरुपात असलेले हे कोर्सेसची मर्याचा तासांच्या स्वरुपात आहे. काही कोर्सेस 10 तासांचे तर काही कोर्सेस 4 तासांचे देखील आहेत. गुगलचे कोर्स पुर्ण झाल्यानंतर एक छोटीशी ऑनलाईन परीक्षा देखील घेतली जाते आणि सर्टिफिकेट देखील दिले जाते. जे जगभरात तुम्ही कुठेही नोकरीसाठी गेले असता ग्राह्य धरले जाऊ शकते.

Google Digital Marketing Course

मित्रांनो Google Digital marketing course  या कोर्सच्या मदतीने तुम्ही डिजिटल मार्केटिंग कशी करायची हे शिकणार आहात. हा कोर्स तुम्हाला इंग्रजी भाषेत उपलब्ध असला तरी ही भाषा तुम्हाला नक्कीच समजू शकेल. कारण अगदी सोप्या इंग्रजीमध्ये हे कोर्सेस डिझाईन करण्याच आले आहेत. संपूर्ण जगभरात डिजिटल मार्केटिंगचे वाढते महत्व लक्षात घेता गुगलने हा कोर्स तयार केला आहे.

Google Business Course

गुगल कंपनीने त्याच्या प्लॅटफॉर्मवर दुसरा अत्यंत महत्त्वाचा कोर्स उपलब्ध करुन दिला आहे तो म्हणजे Google Business Course. हा कोर्स इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक असते याचे संपूर्ण नॉलेज या कोर्समध्ये देण्यात आले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top