Cibil Score | सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोजच्या महागाईमुळे पैशांची बचत करणे जमेनासे झाले आहे. त्यामुळे या सामान्य नागरिकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागते. परंतु कर्ज काढण्यासाठी बँकेचे पायरी चढताच सिबिल स्कोर (Cibil Score) विचारला जातो. या सिबिल स्कोरच्या जोरावर बँक तुम्हाला कर्ज देत असते. तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर बँक तुम्हाला कधीच कर्ज देत नाही. त्याचबरोबर कोणी कोणी सिबिल स्कोरसाठी धडपडतही नाही. चला तर मग सिबिल स्कोर काय असतो आणि तो वाढतो कसा याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सिबिल स्कोर म्हणजे काय?
सर्वप्रथम आपण सिबिल स्कोर म्हणजे काय? हे जाणून घेऊयात. सिबिल स्कोर म्हणजे एखाद्या व्यक्तीला कर्ज दिल्यानंतर तो कशा पद्धतीने त्या कर्जाची परतफेड करत आहे. याचा पुरावा म्हटलं तरी चालेल. ज्याचं कारण म्हणजे तुम्ही जर बँकेकडून कोणतेही कर्ज घेतलं आणि त्याची व्यवस्थित परतफेड केली तर तुमचा सिबिल स्कोर चांगला असतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान असतो. जर कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचे सिबिल स्कोर चांगला असेल तर बँक त्याला कर्ज देण्याची जोखीम पत्करते. अशाप्रकारे तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला बँक कर्ज देऊ शकते.
सिबिल स्कोर कसा कमी होऊ शकतो?
अनेकदा बरेच ग्राहक आपले क्रेडिट कार्ड सतत बदलत असतात. परंतु तुम्हाला हे माहीतच नाही आवश्यक आहे की, जोपर्यंत तुम्हाला क्रेडिट कार्ड वरून कोणतीही चांगली ऑफर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला क्रेडिट कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यामुळे सतत क्रेडिट कार्ड बदला न बदलण्याचा सल्ला तज्ञ देतात. त्याचबरोबर तुमच्या क्रेडिट कार्ड मध्ये जर काही समस्या निर्माण झाली तर, जसे की क्रेडिट हिस्टरी तर तत्काळ ती बँकेत जाऊन सोडवावी. अन्यथा त्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होऊ शकतो.
सिबिल स्कोर कसा वाढवावा?
आता तुम्ही म्हणाल सिबिल स्कोर जर इतका महत्त्वाचा आहे तर तो वाढवायचा कसा? तर सिबिल स्कोर वाढवण्यासाठी त्याची व्यवस्थित काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. तर तुम्ही छोटे-मोठे कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची प्रत्येक हप्त्याला व्यवस्थित परतफेड करणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या हप्त्याची परतफेड त्याच तारखेला करता त्याचवेळी तुमचा सिबिल स्कोर वाढत असतो. परंतु तुम्ही एखादा दिवस जरी हप्ता फेडण्यासाठी उशीर केला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होऊ शकतो. इतकच नाही तर तुम्हाला त्या कर्जाचे व्याजदरही लागतात. त्यामुळे सिबिल स्कोर वाढवण्यासाठी केवळ कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरणे आवश्यक आहे. याच पद्धतीने तुम्ही आपला सिबिल स्कोरचा आकडा वाढवू शकता.