आयकर विभागाकडून करदात्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला; करदात्यांची होत आहे फसवणूक

भारतीय आयकर प्रणालीवर नेहमीच विविध चर्चा रंगताना दिसून येतात. परंतु भारतात असे अनेक नागरिक आहेत चे इमाने इतबारे दरवर्षी कर भरतात. 2022-23 या वर्षात 7.4 करोड भारतीयांनी कर भरला. परंतु आयकर विभागाने करदात्यांना सावधरिगी बाळण्याचा सल्ला जाहीर केला आहे. नक्की असे का केले आहे आयकर विभागाने हे आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

 31 जुलै 2024 कर भरण्याची शेवटची तारीख

आपण सगळेच जाणतो की, 31 जुलै 2024 ही यावर्षीचा कर भरण्याची अंतीम तारीख होती. यादिवशी ज्यांनी ज्यांनी कर भरला नसेल त्यांना आयकर विभागाकडून नोटीस येते आणि ज्यांनी ज्यांनी कर भरला त्या करदात्यांना आता रिफंडची प्रतीक्षा आहे. परंतु याचाच फायदा काही फायदा फसवणूक करणारे घेत आहेत. याबाबत काही राज्यांमध्ये घटना देखील घडल्या आहेत. म्हणूनच आयकर विभागाने करदात्यांना याबाबत सावध केले आहे. करदात्यांची कशी फसवणूक केली जाते, त्यांना कॉलवर काय सांगितले जाते याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

आयकर विभागाने केली सोशल मीडियावर पोस्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X यावर आयकर विभागाने करदात्यांना सावधानी बाळगण्यासंबंधी पोस्ट केली आहे. भारतीय करदात्यांनी सावध राहावे असे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.  करदात्यांना रिफंड संदर्भात त्यांच्या फोनवर SMS मिळाल्यास  त्यांनी ते प्राप्तिकर विभागामार्फत खात्री करुन घेणे आवश्यक असल्याचे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.  करदात्यांना त्यांच्या मोबाईलनंबरवर रिफंडबद्दल कॉल किंवा मॅसेज येऊ शकतो. त्यामध्ये क्रेडिट कार्ड नंबर किंवा बँक खाते क्रमांकाची डिटेल्स विचारल्यास नागरिकांकडून ती दिली जाऊ नये असे आयकर विभागाने प्रसिद्ध केले आहे. कारण तशी कोणतीही प्रणाली शासकीय विभागामार्फत प्रस्तापित केलेली नसून. ज्यांनी पैसे उकळायचे हे त्यांची ही कारस्थाने आहेत. त्यामुळे या चोरांच्या कारस्थानांना बळी न पडता नागरिकांनी हुशारीने वागणे गरजेचे आहे.  

दीड लाख रुपयांची झाली फसवणूक

आयकर विभागाकडे भारतातील सर्व करदात्यांचा ईमेल आयडी असतो. विभागामार्फत करदात्यांना ईमेलद्वारे रिफंडची माहिती दिली जाते. हल्ली रिफंडशी संबंधित आलेल्या मेलवर क्लिक केल्यानंतर एका व्यक्तीने चक्क दीड लाख रुपये गमावल्याचेही आयकर विभागाने सांगितले आहे. काही फसवे लोक हा मेल करीत आहेत. मेल आणि मेसेजद्वारे  नागिराकंना ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते आणि त्यानुसार  नागरिकांनी ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यांचा फोन हॅक केला झाला आणि शेवटी नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे  काढण्यात येतात. या टोळीला पडकण्यासाठी केंदीय गृहमंत्रालय काम करीत आहे. परंतु नागरिकांनी याब्बत सावधगिरी बाळगावी असे देखील आयकर विभागाने सांगितले आहे.

Leave a comment