महिला होणार उद्योजिका! केंद्र सरकारच्या ‘उद्योगिनी’ योजनेअंतर्गत महिलांना तब्बल तीन लाखांपर्यंत मिळणार कर्ज 

सध्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या याच प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. देशातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना कर्ज देण्यात येते. तसेच महिलांना व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर सरकार व्याजदरही कमीच लावते. त्याचबरोबर काही प्रमाणात अनुदान देखील देते. आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी सरकारने महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू केली आहे.

Udyogini Yojana
Udyogini Yojana

उद्योगिनी योजना

केंद्र सरकारने महिलांसाठी ‘उद्योगिनी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ कर्जाच्या स्वरूपात दिले जाते. यातून महिला त्यांच्या आवडीचे 88 प्रकारचे व्यवसाय निवडू शकतात. या 88 व्यवसायापैकी एका व्यवसायासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून सरकार देत. महिलांनी स्वतःचा लघुउद्योग सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी योजना सुरू केली आहे.  

काय आहे पात्रता? 

केंद्र सरकारच्या उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना 88 प्रकारचे व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी महिलांना केंद्र सरकारकडून उद्योगिनी योजनेअंतर्गत तब्बल 3 लाख रुपयांचे कर्ज मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागते. अर्जदार महिलेचे वय 18 ते 55 असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्ता  अशा महिलांसाठी कर्जाची मर्यादा वगळण्यात आली आहे. इतकच नाही तर त्यांना कर्जावर व्याजदरही आकारले जात नाही. तसेच इतर प्रवर्गातील महिलांना या योजनेअंतर्गत दहा ते बारा टक्क्याने व्याजदर दिले जाते. तसेच या कर्जाचे वाटप हे बँकेकडून केले जाते. त्यामुळे बँकेच्या नियमानुसार अर्जदार व्यक्तीला कर्जाचे व्याजदर मोजावे लागतात. 

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड 

अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

जन्माचा दाखला 

उत्पन्नाचा दाखला

रहिवासी दाखला

जात पडताळणी प्रमाणपत्र

दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींनी शिधापत्रिकेची प्रत

कसा घ्यावा लाभ? 

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेबाबत तुमच्या बँकेत विचारणा करावी लागेल. बँकेत संपर्क साधल्यानंतर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती देण्यात येईल आणि तेथे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WhatsApp Link