आता गॅस सिलेंडर धारकांना ओटीपीशिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर, पहा काय आहे प्रक्रिया? 

सध्याचे जग हे डिजिटल आहे. त्यामुळे या डिजिटल युगात प्रत्येक नवीन गोष्टी या डिजिटल होत चालले आहे. कुठली गोष्ट करायचा म्हटलं की, मोबाईल लागतोच. त्या गोष्टीची उलट तपासणी केल्यानंतरच ती पूर्ण होत आहे. अशातच आता एलपीजी कंपन्यांनी देखील ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ऑनलाईन बुकिंग सेवा करण्यासाठी ग्राहकांना काही गोष्टी बंधनकारक असणार आहेत. तरच त्यांना ऑनलाईन बुकिंगमधून गॅस सिलेंडर मिळेल. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाइन गॅस बुकिंग कशाप्रकारे गॅस बुक केला जातो.

Gas Cylinder OTP Compulsory
Gas Cylinder OTP Compulsory

गॅस सिलेंडरसाठी ओटीपी सांगणे बंधनकारक

आता तुम्ही जर मोबाईल वरून ऑनलाईन गॅस बुकिंग केला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक झाले आहे. जर तुम्ही ओटीपी सांगितला तरच तुमच्या घरी गॅस सिलेंडर येऊ शकतो. अन्यथा तुम्ही केलेली गॅस बुकिंग ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मोबाईल वरील बुकिंग चा ओटीपी सांगता त्यावेळी तुमची डिलिव्हरी यशस्वी होते. त्यामुळे ज्या मोबाईल वरून गॅस बुकिंग केला आहे, तो मोबाईल घरी असणे आवश्यक आहे. अन्यथा ओटीपी देण्याच्या वेळी तारांबळ उडू शकते. तसेच तुम्ही बाहेर असाल तरी तुमच्या घरच्यांना ओटीपी सांगावा लागेल. 

ओटीपीशिवाय होणार नाही गॅस सिलेंडरची डिलिव्हरी 

तुम्ही यापूर्वीही ऑनलाइन बुकिंग करून एलपीजी गॅस घेतलाच असेल. परंतु आता तुम्हाला पूर्वीसारखेच ऑनलाइन बुकिंगची प्रोसेस करावी लागणार आहे. परंतु त्यामध्ये ऑनलाइन बुकिंगसाठी ओटीपी देणे बंधनकारक असणार आहे. तुम्ही ऑनलाईन एलपीजी गॅस बुकिंग केला, तर त्यानंतर एजन्सी चे कर्मचारी तुम्हाला घरपोच सेवा देतात. परंतु यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी त्यांना सांगावा लागेल. तरच तुम्हाला ते गॅस देऊ शकणार आहेत. एकंदरीत ओटीपी शिवाय तुम्हाला गॅस सिलेंडरची होम डिलिव्हरी होणार नाही. 

काय आहे प्रक्रिया? सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ऑनलाइन गॅस बुकिंग करावा लागेल. त्याचवेळी होम डिलिव्हरी चा पर्याय निवडून तुम्हाला ऍड्रेस अप्लाय करावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या घरी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होईल. त्यावेळी एजन्सीचा डिलिव्हरी बॉय तुम्हाला ओटीपी चे मागणी करेल. त्याचवेळी तुम्हाला ओटीपी देणे बंधनकारक असेल. जर तुम्ही त्या डिलिव्हरी बॉयला ओटीपी दिला तर तुम्हाला तो गॅस सिलेंडर मिळेल अन्यथा तो कॅन्सल करण्यात येईल.    

Leave a comment