WhatsApp Business च्या मदतीने पोहोचा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत; जाणून घ्या अधिक माहिती

आपल्या आजूबाजूला अशी क्वचितच माणसे असतील जी स्मार्टफोन वापरत नाहीत. हल्ली प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन असतो, त्या स्मार्टफोनमध्ये इतर कोणतेही ऍप असो वा नसो परंतु WhatsApp सर्वांच्याच मोबाईलमध्ये असते. फ्री मॅसेजींगपासून सुरु झालेला WhatsApp चा प्रवास आता भलताच स्थिरावला आहे. कारण याचे जगभरात तब्बल 2.78 अब्ज वापरकर्ते असल्याचे सांगण्यात येते. व्हॉट्सऍपचे वापरकर्ते इतक्या वेगाने वाढण्याचे कारण म्हणजे या ऍपचे वापरकर्त्यांच्या गरजांनुसार झालेले अपडेशन. सध्या याच व्हॉट्सऍपचे WhatsApp Business हे फिचर खूप जास्त वापरले जात आहे, चला तर मग याबद्दल अधिक माहिती मिळवूया आणि त्याचा वापर कोणकोणत्या आर्थिक कमाईसाठी कसा करता येईल ते देखील समजून घेऊया.

WhatsApp Business म्हणजे काय?

WhatsApp Business हे निःशुल्क डाउनलोड करता येणारे ॲप आहे. खास छोट्या बिझनेसेससाठी तयार करण्यात आलेले WhatsApp Business हे Android आणि iPhone वर उपलब्ध असणारे ॲप आहे. WhatsApp Business हे ॲप ग्राहकांकडून येणाऱ्या मेसेजेसना ऑटोमेट करण्यासाठी, त्यांना वर्गीकृत करण्यासाठी व त्यांना त्वरित उत्तर देण्यासाठी टूल्स पुरवून ग्राहकांसोबत संवाद साधणे सोपे करते. ते मुद्दामच WhatsApp Messenger च्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला Messenger वर सवय आहे त्याप्रमाणे मेसेजेस पाठवणे, फोटो पाठवणे अशाप्रकारेच तुम्ही हे ॲप वापरू शकता.

WhatsApp Business मधील महत्त्वाची वैशिष्ट्ये

सध्या  ॲपमध्ये WhatsApp Business प्रदान करत असलेली काही  महत्त्वाचे फीचर्स खालीलप्रमाणे पाहू शकता

·      बिझनेस प्रोफाइल या फीचरच्या मदतीने तुमच्या ग्राहकांना तुमचा पत्ता, बिझनेसची माहिती, ईमेल ॲड्रेस आणि वेबसाइट याची माहिती मिळेल.

·      लेबल्स वापरून तुम्ही तुमची चॅट्स आणि मेसेजेसना संगतवार लावू शकता.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      मेसेजिंग टूल्स वापरून तुम्ही ग्राहकांना झटपट प्रतिसाद देऊ शकता.

या व्यवसायांना झाला मोठा फायदा

WhatsApp Business जगभरातील विविध प्रकारच्या व्यवसायिकांना फायदा झाला आहे. त्यापैकी भारतातील व्यवसायिकांचेच सांगायचे झाले तर कपडा विक्री करणारे व्यवसायिक, छोट्या मोठ्या वस्तूंची विक्री करणारे व्यवसायिक या सर्वांनाच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत त्यांचे प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी WhatsApp Business appची वेळोवेळी मदत झालेली आहे.

कोणत्याही डिजिटल स्ट्रॅटेजीशिवाय होत आहे व्हॉट्सऍपच्या मदतीने काम

सोशल मिडियावर एखाद्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी डिजिटल स्ट्रेटेजीची गरज असते परंतु WhatsApp Business app च्या मदतीने झटपट ग्राहकांपर्यंत पोहोचता येते आणि कोणत्याही एक्स्ट्रा स्ट्रेटेजीची गरज भासत नाही. त्यामुळे अधिक पैस खर्च न करता WhatsApp Business app च्या मदतीने व्यवसायिक त्यांचा व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवणे जास्त पसंत करतात. कमी खर्चात जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचल्यामुळे नफा जास्त होतो.

Leave a comment