रेशन कार्ड बंद होण्याआधी करा आधार कार्डशी लिंक; शासनाने दिली मुदत वाढवून

रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे आता नागरिक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आधारकार्ड रेशनकार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. या निर्णयामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकाने ही माहिती लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

adhar card pan card

मुदत वाढवुन देण्याचे कारण

महाराष्ट्र शासनाने नागरिकांना  रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत वाढवून दिली आहे त्यामगचे महत्त्वाचे कारण म्हणजे. सरकारने ही मुदतवाढ देण्यामागे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बोगस लाभार्थ्यांना हटवणे आणि रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण करणे.  यापूर्वी ३० जून पर्यंत मुदत होती, परंतु आता ती वाढवून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिकृत सूचना जाहिर केली आहे.

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

केंद्र शासनाच्या वन नेशन वन रेशन योजनेचा मुख्य उद्देश  असा आहे की, देशातील कोणत्याही राज्यातील पीडीएफ रेशन दुकानात कोणत्याही ठिकाणाचा नागरिकाला त्याचे रेशन कार्ड वापरून रेशन  घेता यावे.   ही योजना सुरू होण्याच्या आधी  नागरिकांना त्यांच्या भागात ठराविक रेशन दुकानातूनच रेशन घ्यावे लागत होते. त्यामुळे जे नागरिक बाहेरगावी राहत होते त्यांना हे रेशन घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या.  नागरिकांच्या या अडचणीचा  विचार करून केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रेशन कार्ड आणि आधार लिंक न केल्यास काय होईल

जे रेशन कार्डधारक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणार नाहीत, त्यांचे रेशन कार्ड  १ ऑक्टोबर २०२४ नंतर बंद करण्यात येणार आहे.  असे शासनाने जाहीर देखील केले आहे.

रेशन कार्डला आधार कार्ड कसे लिंक करावे

तुमच्या परिसरातील सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊन तुमच्या रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करू शकता. तसेच घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने देखील तुम्ही ही ऑनलाईन प्रक्रिया करु शकता.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

 रेशन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी खालील कागदपत्रे मूळ रेशन कार्ड,  आधार कार्डची प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक,  मोबाइल नंबर (OTP साठी),  वैध ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड पैकी काहीही. ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

रेशनकार्ड आधारकार्ड लिंक करण्याचे फायदे

·          रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता येईल.

·          बोगस लाभार्थी शोधणे सोपे होईल.

·          डिजिटल इंडिया मोहिमेला चालना मिळेल.

·          सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचेल.

·          भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल.

Leave a comment