Mutual Fund Investment Tips: आर्थिक नियोजन ही सध्याची आवश्यक गरज बनली आहे. तुम्ही आर्थिक नियोजनाबाबत योग्य वयात योग्य निर्णय घेतले नाही तर नक्कीच तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. कारण सध्याची अर्थव्यवस्था गुंतवणूकीला सपोर्ट करणारी आहे. तुम्ही गुंतवणूक करीत नसाल किंवा तुमची आर्थिक बचत नसेल तर तुम्ही पुढील काळात उत्तम जीवन जगु शकत नाही.
गुंतवणूक वेगाने वाढवण्याचे माध्यम
आर्थिक नियोजन करताना तुम्हाला तुमची गुंतवणूक वेगाने वाढवायची असेल तर म्युच्युअल फंड एसआयपी हा एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर का तुम्ही म्युच्युअल फंडच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि काही चुका टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया की, म्युच्युअल फंण्ड्समध्ये गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेच.
तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्ट करा
गुंतवणुक मुख्यतः बचत आणि भविष्याचे नियोजन यासाठी करण्यात येते. नेहमी गुंतवणूक करताना नेमकेपणाने उद्दिष्ट ठरवा. तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुमच्या कोणत्या गरजा पूर्ण करणार आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. मुलांचे शिक्षण, लग्न, परदेश भ्रमण, वैद्यकिय सुविधा अशा एक नाही अनेक कारणांसाठी तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करु शकता फक्त पैशांची बचत आणि ध्येयनिश्चिती या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. Mutual Fund Investment Tips
एसआयपी गुंतवणूक कशी केली जाते हे समजून घ्या
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, एसआयपी – ज्यामध्ये ठराविक रक्कम म्युच्युअल फंड योजनेत नियमित अंतराने गुंतवली जाते, सामान्यतः म्युच्युअल फंड योजना – सामान्यतः मासिक आधारावर – निश्चित रकमेची गुंतवणूक करणे समाविष्ट आहे – अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.
·बहुतेक लोक जलद परताव्याची अपेक्षा करून निर्णय घेतात त्यामुळे त्यांची गुंतवणूक कमी कालावधीसाठी होते. त्यात त्यांचे नुकसान होत असते हे त्यांना समजत नाही. तुम्ही तसे करु नका.
·तुमचे पैसे एकाच फंडात गुंतवले तर अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमची बचत विभागून गुंतवणूक करा. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकेल.
· तुमच्या गुंतवणुकीचा नियमितपणे आढावा घ्या तसे न केल्यास आर्थिक नियोजन कोलमडू शकते. बाजारातील उतार चढाव यांकडे म्हणजेच बदलांकडे दुर्लक्ष केल्यास गुंतवणूकीच्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे बाजारातील प्रत्येक घटनेकडे तुम्ही बारकाईन लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते. Mutual Fund Investment Tips