घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पहा किती रुपयांनी झाली कपात! Domestic Gas Cylinder Rate

घरगुती गॅस वापरणाऱ्या देशभरातल्या सर्व लोकांसाठी विशेषत गृहिणीसाठी एक खुशखबर आहे. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात घोषित केली आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे लोकांमध्ये काहिसे आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या या नव्या घोषणेनुसार आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 802.50 इतकी होणार आहे. या नविन किंमती देशभरातील सर्व शहरांमध्ये लागु करण्यात येतील. जरी देशभरात एकच किंमत लागु केली असली तरी राज्यानुसार वाहतूक खर्च व स्थानिक करांमुळे सिलिंडरच्या किंमतीत थोडासा फरक पडू शकतो. तुमच्या शहरातील अचुक किंमत पाहण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटच्या अवश्य भेट दयावी. Domestic gas cylinders

Domestic Gas Cylinder Rate
Domestic Gas Cylinder Rate

गेल्या अनेक महिन्यांपासुन घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत आपल्याला सातत्याने वाढ होताना दिसते. एप्रिल 2024 मध्ये, गॅस सिलेंडरची किंमत ही 900 रुपयांपर्यत पोहचली होती तर मे आणि जून महिन्यांत ही किंमत 902.50 रुपयांवर जाऊन स्थिर राहिली जी गेल्या अनेक वर्षातली सर्वाधिक किंमत ठरली.

सरकारने घोषित केलेल्या नव्या किंमतीनुसार 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना 802.50 रुपये मोजावे लागतील. ही किंमत मागील महिन्याच्या तुलनेत 100 रुपयाने कमी आहे.

सरकारने ही घट करण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एलपीजी च्या किंमतीत झालेली घसरण हे महत्वाचे कारण  सांगितले आहे, कच्चा तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे एलपीजी च्या किंमतीवर परिणाम झाल्याचे सरकारने स्पष्ट केले.

सरकारच्या या निर्णयाचे मध्यमवर्गाकडुन स्वागत होतांना दिसते. गरीब कुटुंबाना यांचा मोठा दिलासा मिळणार आहे. दर महिन्याला 100 रुपये तर वर्षभरात हीच रक्कम 1200 रुपयांवर पोहचते जी अनेक कुटुंबासाठी मोठी रक्कम ठरते. Domestic gas cylinder rate

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तज्ञाच्या म्हणण्यानुसार पुढील काही महिने तरी या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. जर कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या तर गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.

परंतु सदय स्थितीत घरगुती सिलेंडरच्या किंमतीत झालेली घसरण ही ग्राहकांसाठी दिलासादायक घटना आहे. तरी पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे हे दिर्घकालीन फायदेशीर ठरणारे आहे. Domestic gas cylinder rate

Leave a comment