शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरूच असतात. गुंतवणूकदारांना देखील शेअर खरेदी केल्यानंतर कधी नफा मिळतो तर कधी तोटा होतो. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात देखील शेअर बद्दल धाकधूक असते. नुकताच आता सरकारी शेअरने धमाका उडवून दिला आहे. त्यामुळे हा शेअर खरेदी करणारे गुंतवणूकदार मालामाल होणार आहेत. मागच्या काळात महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे शेअर घसरले होते. परंतु आता हा शेअर अवघ्या सात दिवसात जबरदस्त वाढला आहे. चला तर मग जाणून घेऊया या शेअरमध्ये किती वाढ झाली आहे आणि त्याचा गुंतवणूकदारांना किती फायदा होणार आहे.
सरकारी दूरसंचान कंपनी एमटीएनएलचे शेअर 22 जुलै रोजी जवळपास 83 रुपयांच्या आसपास उघडला होता. मात्र बजेट संपतात हा शेअर खाली घसरला होता. परंतु नंतर या शेअरने दिवसाचा व्यवहार संपेपर्यंतच जोरदार झेप घेतली.
त्याचवेळी या शेअरची किंमत 84 रुपये झाली. तेव्हापासून या शेअरमध्ये सातत्याने वाढत होत आहे. शुक्रवारी हा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 97 रुपयांच्याही पुढे गेला. अर्थसंकल्पात घोषणा झाल्यापासून हा शेअर सातत्याने वाढत असून या महिन्यात या शेअरचे गुंतवणूकदार देखील दुप्पट झाले आहेत.
4 दिवसांत शेअरमध्ये वाढ
अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी टेलिकॉम कंपन्यांसाठी बॉक्स उघडला होता. ज्यामध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांचा समावेश होता. या घोषणेपासून या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.
या शेर न अवघ्या चार दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 24% जबरदस्त परतावा दिला. एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 44.19 रुपये इतकी होती. तर आता त्याची किंमत 97. 08 इतकी वाढली आहे.
14 लाखांचा जबरदस्त परतावा
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यात या शेअरमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर आज त्या गुंतवणूकदाराचे 2 लाख 20 हजार रुपये झाले असते. म्हणजेच त्या गुंतवणूकदाराला 1 लाख 20 हजार रुपये नफा मिळाला असता.
या शेअरच्या पाच वर्षांच्या परताव्याबद्दल बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांना या शेअर ने पाच वर्षात 1 हजार 428 टक्के परतावा दिला आहे. एकंदरीत एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते त्यांना आज 14 लाख रुपयांचा मोठा फायदा झाला असता.