Indexation Benefits Removed: शेअर मार्केट, प्रोपर्टी किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या घोषणा तुम्हाला माहिती असायलाच हव्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कॅपिटल गेन टॅक्समध्ये मोठे बदल केले आहेत. त्याचबरोबर इंडेक्सेशन बेनिफिटचा नियमही रद्द करण्यात आला आहे. ज्याचा थेट परिणान रियल इस्टेटच्या खरेदी विक्रीवर होणार आहे. म्हणूनच आपण सर्वात आधी कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय हे समजून घेऊया!
कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय?
कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे नक्की काय हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. तुम्ही एखादी जमीन किंवा घर खरेदी केले ते खरेदी करताना तुम्ही रेडीरेकनर दराप्रमाणे जितके पैसे दिले ती रक्कम लक्षात ठेवा. काही कालावधीनंतर तुम्ही ती जमीन किंवा घर विकले. विकताना तुम्हाला जो नफा झाला त्या संपूर्ण नफ्यावर सरकार आता टॅक्स लावणार आहे. आणि जे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करु इच्छितात त्यांच्यासाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. कारण त्यांच्या नफ्यावर आता लाँगटर्म, शॉटटर्म टॅक्स लागणार आहे. Indexation Benefits Removed
हे आहेक बदल
संपत्तीची विक्री करायची झाल्यास लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) 20 टक्क्यांनी कमी करुन 12.5 टक्के इतका करण्यात आला आहे. मालमत्ता किंवा शेअर्सचा स्टॉक 1 वर्षांपर्यंत होल्ड करुन ठेवता तेव्हाच त्याला लाँग टर्म गुंतवणूक असं मानलं जातं. या संकल्पनेमध्ये शेअर, म्युचअल फंड यांचाही समावेश आहे. आता लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 12.50 टक्क्यांच्या दराने द्यावा लागणार आहे.
घर, जमीन मालमत्ता विक्री करणाऱ्यांना मोठा झटका
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या या घोषणांमुळे मालमत्तेची विक्री करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. त्याचे कारण असे की, सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकते की सरकारने लाँग टर्म कॅपिटल टॅक्स कमी केला आहे. पण तसे अजिबात नाहीये. मालमत्ता विक्री केल्यानंतर आत्तापर्यंत तो इंडिक्सेशन बेनिफिट मिळत होता तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता धारकाच्या नफ्यातील बराचसा भाग सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. त्यामुळे यापुढे तुमची मालमत्ता विकताना योग्य तो निर्णय घ्या किंवा सरकारचे हे धोरण बदलेपर्यंत वाट पहा. Indexation Benefits Removed