म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवताय मग हे जाणून घ्या!

म्यच्युअल फंड्स ही एक अशी योजना आहे जेथे तुमचा गुंतवलेला पैसा अडकून राहत नाही, तर तो गुंतवला जातो! म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना, सर्वात अधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “माझा पैसा अडकून राहील का?” तर नक्कीच नाही. म्युच्युअल फंड्स मधील तुमचे पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवले जातात. त्यामुळे बाजारात कितीही मंदी असो वा उछाल तुम्हाला ठरलेला परतावा मिळतो. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना अनेकजण संभ्रमात असतात त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. Mutual funds

mutual fund

म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना या दोन गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे:

· तुम्हा कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेमध्ये पैसे गुंतवले तर ते नक्कीच अडकत नाहीत. पैसा गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीच्याच नावावर असतात. फक्त त्याचे व्यवस्थापन एका प्रोफेशनल फंड व्यवस्थापकाद्वारे केले जाते.

· तुम्ही केलेली गुंतवणूक ही नेहमीच तुमच्यासाठी सहजपणे उपलब्ध असते. म्युच्युअल फंडची रचनाच अशी करण्यात आलेली असते की तुम्ही केलेली गुंतवणूक कायम परिवर्तनशील राहील. इतकेच नाही तर तुम्ही गुंतवलेले पैसे अंशतः किंवा पूर्णतः काढून घेऊ शकता. आपण म्युच्युअल फंड कंपनीला आगाऊ निर्देश देऊन तसेच पैसे काढून घेण्याची तारीख ठरवून, त्यानंतर एखाद्या ठराविक तारखेला आपल्या बँक खात्यामध्ये, आपल्या निवडीनुसार दर महिन्याला किंवा दर त्रैमासिक एक ठराविक रक्क्म हस्तांतरित करुन घेऊ शकता .

या सर्व माहितीनुसार तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आवडीच्या म्युच्युअल फंड स्किममध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच या म्युच्यअल फंड्स सोबत मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा आनंद घेऊ शकता.  अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण असं म्हणू शकतो की आपले पैसे सुरक्षित रित्या योग्य परताव्यासाठी तयार करण्याचे व्यवस्थापन विविध कंपन्यांच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्स करीत असतात. Mutual funds

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a comment