पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेंतर्गत गर्भवती महिलांना मिळणार 5000 रुपये; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया 

केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आर्थिक सहाय्य देणे हा मुख्य उद्देश आहे. विशेषतः केंद्र सरकार महिलांना सक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे योजना राबवत आहे. अशातच आता केंद्र शासनाने गरोदर महिलांना आर्थिक (Financial) सहाय्य देण्यासाठी एक योजना सुरू केले आहे. आज आपण याच योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

PM Matrutva Vandana Yojana
PM Matrutva Vandana Yojana

पंतप्रधान मातृत्व वंदना योजना 

केंद्र सरकारने 2017 साली गरोदर महिलांसाठी ‘पंतप्रधान मातृत्व वंदना योजना’ (PM Matrutva Vandana Yojana) सुरू केली आहे. या योजनेतून गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. म्हणजेच या महिला गरोदर महिलांना या योजनेच्या माध्यमातून 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करावा लागतो. पण तो अर्ज कसा करायचा? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत? या संबंधित माहिती पाहूयात. 

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना मिळते आर्थिक मदत?

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील गरोदर महिलांना ही आर्थिक मदत मिळते. देशभरात आर्थिक परिस्थिती कमकुवत आल्यामुळे गरोदर महिला रोज कामाला जातात. यावरच तोडगा काढण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. तसेच महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना गरोदरपणात आराम मिळावा हा सरकारचा या योजनेमागील मुख्य हेतू आहे. 

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा कसा मिळतो? 

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ महिलांना दोन अपत्यांसाठी मिळतो. या योजनेअंतर्गत महिलांना पहिला अपत्यासठी 5 हजार रुपये दिले जातात. तर दुसऱ्या अपत्यासाठी 6 हजार रुपयांची मदत केली जाते. परंतु दुसरे अपत्य जर मुलगी असल्यास या योजनेचा लाभ दुसऱ्यांदा दिला जातो. पहिल्या अपत्यासाठी दोन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. म्हणजेच पहिला हप्त्यात तीन हजार रुपये तर दुसऱ्या हप्त्यात दोन हजार रुपये महिलेच्या खात्यावर जमा केले जातात. 

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेसाठी पात्रता काय? 

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेसाठी काही अटी शर्ती ठेवण्यात आले आहेत. निकषाच्याया तक्त्यात तुम्ही बसाल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ होऊ शकतो. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच ज्या महिला बीपीएल म्हणजेच दारिद्र्यरेषा खालील असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतील महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच ज्या महिलांकडे ई- श्रम कार्ड आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळतो. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळतो. तसेच मनरेगा जॉब कार्डधारक महिलेलाही या योजनेचा लाभ मिळतो

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय? 

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला गर्भवती महिलेचे आधार कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर महिला गर्भवती महिला महिलेचा रहिवासी दाखला असणेही गरजेचे आहे. तसेच गर्भवती महिलेचे रेशन कार्ड असावे. तसेच बह्यारूपी तपासणी कार्ड देखील आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर पैसे जमा बँक पासबुक असणे देखील महत्त्वाचे आहे. तरच तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे येतील. 

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेसाठी कसा कराल अर्ज? 

केंद्र शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी गरावती महिलांना सर्वप्रथम आपल्या अंगणवाडी केंद्रात नोंदणी करावी लागेल. यानंतर सदर गर्भवती महिलेला पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेसाठी एक फॉर्म भरावा लागेल. त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर तो फॉर्म अंगणवाडी केंद्रात जमा करावा लागेल. अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

Leave a comment