तरुणांना महिन्याला 10 हजार देणारी ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना’ काय आहे? कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या सविस्तर 

राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. महिलांना या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी ही योजना आणली खरी पण विरोधकांकडून आणि तरुणांकडून मुख्यमंत्र्यांकडे माझा लाडका भाऊ योजना आणा अशी मागणी करण्यात आली. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी ‘माझा लाडका भाऊ योजना’ सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तरुणांना या योजनेच्या माध्यमातून कामाला लावण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे? तरुणांना या योजनेचा फायदा काय होणार आहे? तसेच या योजनेच्या माध्यमातून तरुणांना किती आर्थिक सहाय्य मिळेल?

Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना काय आहे? 

मुख्यमंत्र्यांनी तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सुरू केली. या योजनेचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे सरकार तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून शिक्षणाानुसार पैसे देणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेटशिप करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणही होईल आणि त्यांचा कामातही जम बसेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यही मिळेल, याबाबतची सर्व व्यवस्था सरकारने केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. 

मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना

तरुणांसाठी राबवली जाणारी या योजनेसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना’ असे नाव दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांमधील रोजगाराची समता वाढवणे, तसेच त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यात आणखी वाढ करणे, जगाच्या स्पर्धेच्या युगात नोकरीसाठी सक्षम बनवणे असा या योजनेचा हेतू आहे. ही योजना मुख्यमंत्री जनकल्याण कक्षसह कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाद्वारे राबवण्यात येणार आहे. 

कोणत्या विद्यार्थ्यांना किती मिळणार पैसे? 

तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत शिक्षणाानुसार विद्यार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे बारावी शिक्षण झाले आहे अशा विद्यार्थ्याला दरमहा 6 हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये, तर पदवीधर आणि पद्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय? 

‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजने’चा लाभ घेण्यासाठी तरुणांना काही पात्रतेची पूर्तता करावी लागणार आहे. लाभ घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याचे किंवा तरुणाचे वय 18 ते 35 असणे अनिवार्य आहे. सदर तरुणाने 12 वी पास / ITI/ डिप्लोमा / ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

परंतु ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. त्याचबरोबर लाभ घेणाऱ्या तरुणाचे आधार नोंदणी असावी. तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे. त्याचबरोबर सदर तरुणाने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. हे सरळ साधे निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

इंटर्नशिप कशी असेल?

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी तरुणांना इंटर्नशिप करावी लागणार आहे. तरीही इंटर्नशिप सहा महिन्यांसाठी असेल. या सहा महिन्यांमध्ये तरुणांना काम करावे लागणार आहे. त्यानंतर तरुणांना सरकारच्या माध्यमातून या इंटरनेटसाठी पैसे दिले जाणार आहेत. तरुणाने एका महिन्यात दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजरी दर्शवली तर तळताना त्या तरुणाला त्या महिन्याचा इंटर्नशिपचा पगार दिला जाणार नाही. त्याचबरोबर या अनुभवाच्या जोरावर सदर तरुणाला कुठेही काम मिळेल. सरकारने या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचं आश्वासन दिलं आहे. इतिहासात यापूर्वी अशी कोणती योजना बनली नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Leave a comment