केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना आर्थिक (Financial) पाठबळ मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. याच अनुषंगाने मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ज्याप्रमाणे आणली आहे. त्याचप्रमाणे पीएम श्रम योगी मानधन योजना देखील सुरू केली आहे. पीएम श्रम योगी मानधन योजना (Pm Shram Yogi Mandhan Yojana) काय आहे? याचे फायदे काय आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
PM Shram Yogi Mandhan Yojana
पीएम श्रम योगी मानधन योजना काय आहे?
पीएम श्रम योगी मानधन योजना ही कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर वयाच्या 60 वर्षापासून तुम्हाला 3 हजार रुपये पेन्शन मिळते. योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला दर महिन्याला काही रक्कम द्यावी लागते. या रकमेत सरकारही भर घालते. म्हणजेच लाभार्थ्याने जर महिन्याला शंभर रुपये दिले, तर सरकारही त्यामध्ये शंभर रुपयांची भर घालते. अशाप्रकारे तुम्हाला वयाच्या 70 वर्षांपर्यंत रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर लाभार्थ्यांना ही रक्कम 3 हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते.
कोणाला मिळणार पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ?
तर पीएम श्रम योगी माध्यम योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील मजुरांना मिळणार आहे. म्हणजेच घरगुती कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, कचरा वेचणारे, शिंपी, मध्यान्ह भोजन कामगार, विडी बनवणारे, रिक्षाचालक, रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते, चांभार, तसेच बांधकाम कामगार, हातमाग कामगार, शेती कामगार, मोची, वॉशर या कामगारांना या योजनेचा लाभ मिळतो.
पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ कसा घ्यावा?
तुम्हाला जर पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावी लागते. सर्वप्रथम तुम्हाला पीएम श्रम योगी मानधन योजनेच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर जावे लागेल. त्यावर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बचत खाते किंवा जन धन खात्याबाबत माहिती द्यावी लागेल. त्याचबरोबर पुरावा म्हणून तुम्ही तुमच्या बँकेचे पासबुक चेक बुक किंवा बँकेचे स्टेटमेंट देखील देऊ शकता. तसेच तुम्ही सुरुवातीला खाते उघडतानाच नॉमिनीची नोंदणी करू शकता. त्याचबरोबर सुरुवातीची प्राथमिक रक्कम तुम्हाला रोख द्यावी लागेल. त्यानंतर खाते उघडून तुम्हाला पीएम श्रम योगी मानधन योजनेचे कार्ड मिळेल.
पीएम श्रम योगी योजनेच्या अटी शर्ती काय आहेत?
पीएम श्रम योगी योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती असंघटित कामगार असावा.
तसेच त्याचे मासिक मानधन हे 15000 पेक्षा जास्त नसावे.
सदर व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे बचत खाते किंवा जनधन खाते पासपोर्ट आणि आधार नंबर लिंक असावा.
तसेच केंद्र सरकारच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ त्याने घेतलेला नसावा.
त्याचबरोबर जर लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या वाटेची रक्कम देण्यास काही चूक झाल्यास तर त्याला सर्व रक्कम व्याजासह परत द्यावी लागेल.
तसेच जर लाभार्थ्याचा मध्येच मृत्यू झाल्यास नोमिणीला ही स्कीम लागू होते.