तुम्हीही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया करणे आवश्यक केले आहे. अन्यथा गॅस सिलेंडर धारकांना मोठा फटका बसू शकणार आहे. तर गॅस सिलेंडर धारकांसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु गॅस सिलेंडर धारक या सूचनेकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर केवायसीसाठी (Gas KYC) अंतिम मुदत देण्यात आली आहे.
गॅस सिलेंडर धारकांना वारंवार सांगून देखील ते केवायसी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. मात्र या गोष्टीचा तोटा त्यांना चांगलाच होणार आहे. कारण गॅस केवायसी न केल्यास थेट गॅस सिलेंडर धारकांचे गॅस कनेक्शन रद्द होणार आहे. खरं तर गॅस सिलेंडर वितरकांना केवायसी न केल्यामुळे माहितीचा डाटा अपडेट करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर धारकांनी लवकरात लवकर केवायसी करणे गरजेचे आहे.
Gas KYC
गॅस केवायसी अंतिम तारीख
गॅस सिलेंडर धारकांनी केवायसी न केल्यास त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे. तसेच केवायसी न केलेल्या ग्राहकांना मिळणाऱ्या 300 रुपये सबसिडीचा देखील लाभ मिळणार नाही. गॅस कनेक्शनची केवायसी करण्यासाठी 30 जूनही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्व गॅस धारकांना ही केवायसी करणे अनिवार्य आहे.
गॅस केवायसी कशी करावी?
गॅस धारकांना गॅस एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घेणे घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, मोबाइल नंबर, जोडणी ग्राहकांचे पुस्तक ही कागदपत्रे किंवा ग्राहकांचे फेस रीडिंग हा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे ग्राहकांना केवायसी करता येणार आहे.