Short Selling म्हणजे काय असते | जाणून घ्या Short Selling in Marathi

Short Selling : तर मित्रांनो आपण सोप्या भाषेत समजूया की Short Selling म्हणजे नेमके काय असते.

Short Selling

तर जनरली आपण शेअर बाय करतो आणि तो वर गेल्यावर विकतो आणि आपण आपला प्रॉफिट काढतो पण त्याच्याबरोबर विरुद्ध म्हणजेच आपण आधी शेअर विकतो आणि खाली पडल्यावर खरेदी करतो याला आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो. जनरली शॉर्ट सेलिंग हे अशा शेअर मध्ये केले जाते जिथे आपल्याला वाटत असते की शेअरची प्राईस ही कालांतराने खाली पडणार आहे.

आता हे शॉर्ट सेलिंग नेमकं होतं कसं काय आपले जे शेअर्स नाहीच आहेत त्यांना आपण कसे काय विकू शकतो किती कालावधीसाठी सीमित असतात असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात पडत असतील तर चला एक एक पाहून घेऊ. चला तर मग आपण याला एका उदाहरणाने समजून घेऊ

समजा एक जमीन १० लाख रुपये ची आहे जी तुमची नाहीये आणि आता तुमच्याकडे कोणीतरी गिऱ्हाईक चौकशी करण्यासाठी आले आणि ते जमीन घेण्यात इच्छुक आहेत, आता ही जमीन तर तुमची नाही पण हा व्यवहार तुम्हाला करायचा आहे काही नफा साठी. आणि तुम्ही ती जमीन त्यांना १५ लाखला विकण्याचे ठरवले एक महिन्याच्या आत आता तुम्ही जमिनीच्या मालका सोबत व्यवहार ठरवला की तुम्ही ती जमीन १० लाख रुपयाला विकत घेणार.
जसे खरेदीकराचे 15 लाख रुपये आले तुम्ही त्यातले १० लाख रुपये विक्रेताला देणार. हे प्रकारचे शॉर्ट सेलिंग आहे.
म्हणजेच तुम्ही ती जमीन आधीच विकली जी तुमची नव्हतीच 15 लाख रुपयाला गिऱ्हाईकला. आणि त्यानंतर तुम्ही कमी भावात ती खरेदी केली. हेच शेअर मार्केटमध्ये होत असते शॉर्ट सेलिंग मध्ये. म्हणजे तुम्ही आधी शेअर विकता आणि तो शेअर खाली पडला की तुम्ही ते स्वस्त दरात खरेदी करतात आणि नफा कमवू शकता.
पण याच उदाहरणात जर का विपरीत बाजू आपण बघितली तर ती म्हणजे अशी की तुम्ही 15 लाख मध्ये व्यवहार ठरवला आहे खरेदी करा सोबत. आणि एक महिन्यांमध्ये हा व्यवहार होणार आहे पण एका महिन्यामध्ये समजा त्या जमिनीची किंमत वाढली आणि ती झाली 16 लाख रुपये तर आता तुमचे एक लाख रुपये नुकसान होणार कारण खरेदी करायला तुम्ही पंधरा लाख मध्ये विकण्याचा शब्द दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 16 लाख रुपये ला तीच जमीन खरेदी करणार

आता हेच अक्चुअल शेअर मार्केट मध्ये कसे होते हे आपण बघूया, जसेकी कंपनी एबीसी असेल त्याची किंमत आहे शंभर रुपये म्हणजे एका शेअरची किंमत शंभर रुपये. तर आता आपल्याला जर का ते शेअर्स वाटत असेल की काही काळानंतर त्याची प्राइस कमी येणार आहे आणि आपल्याला आता ते शॉर्ट सेल करायचे असतील तर आपण आपल्या ब्रोकर प्लॅटफॉर्म थ्रू ते शेअर सेल करतो म्हणजेच काय करतो तर ब्रोकर आपल्याला शेअर्स उधार देतो पण हे उधार दिलेले शेअर्स आपल्याला विकत सुद्धा घ्यावे लागतात म्हणजेच कंपनी ए बी सी चे १०० शेअर्स ब्रोकर ने आपल्याला उधार दिले आणि आपण ते शंभर रुपयाला प्रतिशयर च्या भावाने विकले तर आपल्याला मिळणार १००x१०० = १०,०००

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

पण जे शेअर्स आपल्याला ब्रोकरने उधार दिले आहेत ते आपल्याला विकत सुद्धा घ्यायचे आहेत मग आता समजा काही काळाने आपण अंदाज लावल्याप्रमाणे शेअरची किंमत खाली पडली आणि ती आली पन्नास रुपयाला तर आता आपल्याला ते शेअर्स विकत घेताना पन्नास रुपये प्रति शेअरच्या भावाने शंभर शेअर्स म्हणजेच १००X ५०= ५००० हे ब्रोकरला द्यावे लागणार याचाच अर्थ आपला निवळ नफा पाच हजार रुपये.

आता एक विपरीत सिनारियो लक्षात घेऊ

तर तो म्हणजे असा की जर हे शेअर्स खाली पाडायचे ऐवजी वर गेले म्हणजे समजा शेअरच्या प्रतिभाव दीडशे रुपये झाला , म्हणजे ५० रुपये प्रति शेअर तोटा . तर १००x ५०= ५,००० असे नुकसान आपल्याला पाच हजार रुपये ब्रोकरला द्यावे लागतील. 

Short Selling ही लॉंग टर्म मध्ये नाही होऊ शकत शॉर्ट सेलिंग ही फक्त इंट्राडे किंवा डेरिव्हेटिव्ह (ऑप्शन्स , फ्युचर्स) यात होऊ शकते.

आपण जेव्हा नॉर्मल ट्रेड करतो म्हणजेच एखादा शेअर शंभर रुपयाला घेतो आणि तो वाढल्यावर विकतो तर त्याच्या वाढण्याला काही लिमिट नाही हे इक्विटी मध्ये. 

पण जर का आपण शॉट सेलिंग च म्हणलं तर यामध्ये फायद्याला लिमिट आहे पण नुकसानीला लिमिट नाही प्राईज जेवढे जास्त विपरीत विरुद्ध दिशेला जाईल तेवढे नुकसान होत जाणार म्हणून शॉर्ट सेलिंग हे रिस्की सुद्धा आहे.

Read More – Share Market

Leave a comment