CNBC news १८ ने त्यांचा रिपोर्ट मध्ये असते सांगितले आहे कि RBI ला ३१ करोड PayTm wallet हे निकामी होते ३५ करोड पैकी. एवढाच नाही तर एक पॅन कार्ड ला १०० पेक्षा जास्त अकाउंट ला लिंक करण्यात आलेल. चलातर मग जाणून घेऊ PayTm मध्ये नक्की झाले तरी काय कि सर्वत्र चर्चा PayTm ची च चालू आहे ? जाणून घेऊ संपूर्ण कहानी
काही केसेस मध्ये तर १००० पेशा हि जास्त. एवढंच नाही तर KYC चे काही रूल्स आहेत जे त्यांनी पाळले नाहीत आणि अँटी-मनीलॉन्डरिंग रूल्स असतात काही , त्याचे सुद्धा उल्लंघन करण्यात आले आहे. एवढंच नाही तर जेवढे बिझनेस (फायनान्शिअल किंवा नॉन फायनान्शिअल ) आहेत त्यांचे प्रोमोटर च्या ज्या दुसऱ्या ग्रुप कंपनीज आहेत त्यासोबत खूप भेसळपना आहे ,किचकटपणा आहे. जे उल्लंघन आहे.
एका बँकेसाठी हे खूप महत्वाची जवाबदारी असते, हे RBI च्या लक्षात आल्यावर त्यांनी ३१ January ला या संधर्भात नोटीस जाहीर केली. त्यात काही गोष्टी जसा कि टॉप अप, डिपॉसित या सुविधा बॅन करण्यात आल्या २९ फेब नन्तर पासून. तर हे अचानक तर घडले नाहीए. याला आपण सुरवातीपासून समजून घेऊ
हा विषय पेटीएम बँक सुरु झाल्याचा १ वर्ष मधेच सुरु झाल. नियमांचे उल्लंघन , डेटा ची अफरातफरी , फ्रॉड , पारदर्शकता यावर तेव्हापासून च प्रश्नचिन्ह उभे झाल. सगळ्यात पहिल्यांदा पेटीएम ला RBI ने वॉर्न केले २०१८ मध्ये, त्यात हे सांगितलं कि paytm ने बँक लायसन्स च्या नियमांचं उल्लंघन केलाय त्याच बरोबर वरती सांगितलेल्या गोष्टींचे पालन नाही केले ,आणि नवीन अकाउंट ओपनिंग अल्लाउड नाही हे सांगितले, पण त्या नन्तर त्यांनी माफी मागितली.
Paytm ने आणि खात्री दिली असा नाही होणार म्हणून तर बॅन लिफ्ट केलं गेला पण मार्च २२ ला RBI च्या परत लक्षात येत कि अँटी मनी लॉन्डरिंग ,सायबर सिक्युरिटी सारख्या नियमांचा उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि सर्वर जे आहे ते सुद्धा पॅरेण्ट कंपनी One97 यासोबत शेअर करण्यात आलाय. तेव्हा सुद्धा RBI ने सुपरवायझर रेस्ट्रिक्शन लावले आणि न्यू कस्टमर नाही जॉईन करू शकत अशी ताकीद दिली, आणि एक्सटेर्नल ऑडिट फर्म घ्यावी लागेल असा उपदेश केला , मग ऑक्टोबर २०२३ मध्ये अजून एकदा वॉर्निंग आली जेव्हा RBI च्या लक्षात आले कि paytm काहीच सुधारत नाहीए आणि मग RBI ५.३९ करोड ची पेनल्टी लावते.
या सगळ्यामुळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वर प्रश्न उभे झाले आहेत, Paytm चे शेअर सुद्धा रोज 10-20% पडत आहे.