तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्ही आता ते असे मिळवू शकता

आता बऱ्याचदा आपला पॅन कार्ड हरवतं आणि त्याचा आपल्याकडे फोटो सुद्धा नसतो झेरॉक्स सुद्धा नसतं आणि अचानकपणे पॅन कार्ड हरवल्यावर आपल्या बँकेचे व्यवहार किंवा लोन संदर्भातील व्यवहार हे थांबतात तर आपण बघूया की हरवलेले पॅन कार्ड आता पुन्हा कसे काढता येईल आणि हे पॅन कार्ड घरापर्यंत येईल का.

जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्ही आता ते पुन्हा मिळवू शकता तरीही पूर्ण प्रोसिजर जाणून घेण्यासाठी आर्टिकल पूर्ण वाचा. 

जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड वरचा नंबर पुरेसा आहे नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी. आणि यासाठी तुम्हाला कुठे जायचं नाहीये हे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवर सुद्धा करू शकता.

Pan Card Lost
Pan Card Lost

पॅन कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी दोन-तीन मार्ग आहेत.

१. जर तुमच्याकडे पॅन नंबर उपलब्ध आहे.

२. जर तुमच्याकडे पॅन नंबर उपलब्ध नाही पण तुमच्याकडे जर का बँक खाते आहे.

३. जर पॅन कार्ड नंबर पण नाही आणि बँक शाखा सुद्धा जवळपास नसेल.

४. जर तुमचा फोन नंबर पॅन कार्ड ला कनेक्टेड नाही. आणि पॅन कार्ड ची डिटेल्स नाही तर.

१) जर तुमच्याकडे पॅन कार्ड उपलब्ध आहे तर

१. NSDL या वेबसाईटवर सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे.

२. तिथे “PAN”सिलेक्ट करायचे आहे मग “PAN” number टाकायचा आहे

३. आधार कार्डचा नंबर टाकने

४. जन्मतारीख जन्म वर्ष टाकने

५. टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करा.

६. Submit.

२) जर तुमच्याकडे पॅन नंबर नाही पण बँक खाते आहे

जर तुमच्याकडे बँक खाते असेल तर तुम्ही बँकेत जवळच्या शाखेत जाऊन तिथे मॅनेजरला सांगू शकता पॅन कार्ड चा नंबर देण्यासाठी. कारण बँक अकाउंट काढताना तुम्ही बँक नंबर दिलेला असतो तर बँक तुम्हाला पॅन नंबर देऊ शकते. त्यानंतर तुम्ही पॅन नंबर घेऊन पहिल्या क्रमांकावर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून पॅन कार्ड मागवू शकता

३) जर पॅन कार्ड नंबर पण नाही आणि बँक शाखा सुद्धा जवळपास नसेल तर.

तुम्ही इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे कस्टमर केअरला सगळे डिटेल्स सांगून पॅन कार्ड व्हेरिफाय करू शकता त्यानंतर ते तुम्हाला तुमचा पॅन नंबर देतील

४) जर तुमचा फोन नंबर पॅन कार्ड ला कनेक्टेड नाही. आणि पॅन कार्ड ची डिटेल्स नाही तर.

आपल्याकडे पॅन नंबर असेल पण आपला फोन नंबर जर का पॅन कार्ड ला कनेक्टेड नसेल तर आपण पॅन कार्ड अप्लाय करू शकणार नाहीत कारण पहिल्या नंबर मध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार तिथे आपल्याला आपल्या फोन नंबर वर OTP येतो त्यामुळे फोन नंबर कनेक्टेड असणे गरजेचे आहे पण समजा कनेक्टेड नसेल तर?? तर कसे मिळवायचे?? 

तर यासाठी तुम्हाला पॅन कार्ड पुन्हा एकदा अप्लाय करावे लागते. हो बरोबर. आपण ऐकले असेल की आपण पुन्हा एकदा पॅन कार्ड साठी अप्लाय करू शकत नाही. पण तसे नाहीये तर हे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर सुद्धा करू शकता.

या वेबसाईटवर – Click Here

जेव्हा तुम्ही पॅन कार्ड साठी पुन्हा एकदा अप्लाय करा तर तिथे तुम्हाला अप्लाय केल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर स्टेटस दाखवले जाईल की “PAN card already exists” पण इथे घाबरायचं नाही तर आणखी सात-आठ दिवसानंतर जर का तुम्ही बघितले तर हे स्टेटस चेंज होते. आणि पॅन कार्ड ची कॉपी तुमच्या ईमेल वरील आणि ओरिजनल पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून तुमच्या घरी पाठवण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top