जनधन खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होऊ लागले दोन हजार रुपये, लगेच जाणून घ्या 

केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक महत्त्वकांशी योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम करत आहे. याच महत्वकांशी योजनेपैकी असलेले पंतप्रधान जन धन योजना हे आहे. केंद्र सरकारने ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू केली होती. केंद्र सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील हेतू असा होता की, देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधांशी जोडणे. आता असे म्हटले जात आहे की जनधन खात्यावर केंद्र सरकार दोन हजार रुपये जमा करत आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

पंतप्रधान जनधन खात्याचे उद्दिष्टे काय? 

आपण सर्वप्रथम पंतप्रधान जन धन योजनेचे हे प्रमुख उद्दिष्ट काय आहे ते पाहूयात. या योजनेमागे प्रमुख उद्दिष्टे पाहायचं म्हटलं तर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आहे. तसेच त्यांना बचतीसाठी प्रेरित करणे आहे. सरकारी लाभ थेट त्यांच्या या खात्यात हस्तांतरित करणे हा आहे. त्याचबरोबर या योजनेचा वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देणे हा देखील आहे. 

जन धन खातेदारकाला काय मिळतो फायदा? 

तुम्हाला जनधन खाते उघडण्यासाठी एकाही रुपयाची गरज भासत नाही. कारण जन धन खाते तुम्ही झिरो बॅलन्स वर काढू शकता. त्याचबरोबर जनधन खाते उघडणार्‍या प्रत्येक ग्राहकाला मोफत रूपे डेबिट कार्ड देण्यात येते. इतकच नाही तर जनधन खाते धारकाला एक लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देखील देण्यात येतो. त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कोणाला मिळणारं 2 हजार रुपये? 

पंतप्रधान जन धन खाते योजनेअंतर्गत जे खातेधारक नवीन आहेत अशा खातेधार दोन हजार रुपयांचा तात्काळ ओवरड्राफ्ट मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या खातेदारकांचे खाते सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असेल अशा खातेदारकांसाठी ऑफरड्राफ्टची मर्यादा वाढवून दहा हजार रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही सुविधा खातेधारकांना कोणत्याही हमीशिवाय प्रदान केले जाते. अशाप्रकारे जन धन खातेधारकांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होऊ लागले आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WhatsApp Link