Mahindra Thar Roxx:  15 ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत लाँच होणार महिंद्रा थार रॉक्स; थार लवर्समध्ये उत्साह

महिंदा ही भारतातील गाड्यांचे उत्पादन करणारी महत्वाची कंपनी आहे. ही एक भारतीय कंपनी असून वैविध्यपूर्ण आणि सुविधाजनक लग्झरी गाड्या भारतीय ग्राहकांना पुरवणे हे या कंपनीचे ध्येय आहे. Mahindra Thar Roxx ही कार लाँच कधी होणार याबद्दल महिंद्रा कंपनीने तारीख जाहीर केली आहे. तसेच कारचा टिझर देखील सोशल मिडियावर आला आहे. Mahindra Thar Roxx कार ही येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाँच होणार आहे. चला तर मग या कारची वैशिष्ट्ये जाणून घेऊया!

Mahindra Thar Roxx
Mahindra Thar Roxx

Mahindra Thar Roxx महिंद्रा थार रॉक्स

महिंद्रा रॉक्स ही थार एसयूव्हीची 5-डोअर व्हर्जन आहे. ही SUV कारच्या दुनियेत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. महिंद्रा कंपनीने महिंद्र थार या स्वतंत्र सोशल मीडियावर सोमवारी 29 जुलै रोजी टीझरसह प्रकाशीत केला आणि कारच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. याआधीही कंपनीने 15 ऑगस्ट चा निमित्त ठरवत कंपनीचे इतर मॉडेल्स लाँच केले होते. भारताचा स्वतंत्र्य दिन हे एक उत्तम निमित्त ठरत आहे तरुणाईला नव्या कारची भुरळ पाडण्यासाठी.

थार रॉक्सचे नवे डिझाइन

महिंद्रा थार रॉक्समध्ये सी-आकाराचे LED DRL बसविण्यात आले आहेत. हेडलाइट युनिट्ससह एक नवीन ग्रिल देखील देण्यात आली आहे.  या नवीन SUV मध्ये 18-इंचाचे अलॉय व्हील बसविण्याची सुविधा देखील देण्याच आली आहे.  मोठ्या व्हील बेससोबतच नवीन थारमध्ये आणखी दोन दरवाजे जोडण्यात आले आहेत.

थार रॉक्सची भन्नाट वैशिष्ट्ये

महिंद्रा थार रॉक्समध्ये वाहनचालकाचा कंफर्ट जपण्यासाठी पॉवर्ड ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे.  या कारमध्ये 360-डिग्री व्हिजन असलेला कॅमेरा देखील  देण्यात आला आहे.  सुरक्षेसाठी कारमध्ये ADAS फीचर देखील समाविष्ट केले जाऊ शकते. ड्युअल 10.25-इंच टचस्क्रीनने नवीन थार सुसज्ज करण्यात आली असून थार लवर्सला हे फिचर्स भुरळ घालण्यासाठी पुरेसे आहेत. आधिच तरुणाईमध्ये महिंद्रा थार या कारबद्दल भन्नाट क्रेज आहे आणि त्यात भर म्हणजे ही सगळी वैशिष्ट्ये पाहता नक्कीच या नव्या थार रॉक्सच्या माध्यातून महिंद्रा कंपनीचा चांगलाच व्यवसाय होणार आहे असे दिसून येते.

अधिक माहितीसाठी https://x.com/Mahindra_Thar या लिंकवर क्लिक करुन महिंद्रा थारच्या ऑफिशिअल अकाऊंटला फॉलो करायला विसरु नका.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a comment