इंटरनेट विश्वाची आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन बीएसएनएल या सरकारी कंपनीने देखील आकर्षक स्वतातील डेटा प्लान सुरु केले आहेत. याचा फायदा खेड्यापाड्यातील जनतेसह तरूणाईला होणार आहे. मुख्यत: सामान्य जनतेच्या खिशाला देखील परवडणारे आहेत. या प्लानमध्ये कंपनी 4G प्लानसह इतर ऑफर्स देखील देत आहे. चला तर मग BSNL चे अत्यंत कमी दरातील परंतु अत्यंत कामाचे असे रिचार्ज प्लॅन्स जाणून घेऊ.BSNL Recharge plan
BSNL च्या किफायतशीर ऑफर्स
इतर मोबाईल कंपन्यांच्या 5G च्या विश्वात 4G परवडणाऱ्यांना या ऑफर्स किफायतीशीर ठरणार आहेत. आपल्या इंटरनेट वापरानुसार व बोलण्याच्या आवश्यकतेनुसार गिऱ्हाईकाला मोबाईल प्लान निवडता येणे शक्य आहे. डेटाची गरज नसल्यास फक्त अनलिमिटेड टॉकटाइम देखील यात उपलब्ध आहेत.
जेथे, तुमचे पैसे फक्त तुमच्या बोलण्यासाठीच वापरले जाणार आहेत. तसेच या पॅकेजेस मध्ये संदेश SMS पाठविण्याची देखील मुभा असणार आहे. असेही प्लान तुम्ही निवडू शकता. ज्यांना वर्षभर किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी किंवा कमी कालावधीसाठी रिचार्ज पर्याय हवे असतील असे पर्यायही BSNL कंपनीने आपल्या ग्राहकांना दिले आहेत. अशा ऑफर्समुळे BSNL च्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सरकारी कंपनी जाहीर केलेल्या प्लानचा लाभ जास्तीत जास्त ग्राहक घेतीलच यात शंक नाही.
या आहेत BSNL च्या अनलिमिटेड ऑफर्स –
· २ दिवसांचा प्लान फक्त १८ रु.,१ GB डेटा
· १४ दिवसांसाठी ८७ रु, , १०० SMS प्रतिदिन, १ GB डेटा
· १८ दिवसांसाठी ९९ रु., Free PRBT
· १८ दिवसांसाठी २ GB डेटा
· २० दिवसांसाठी ११८ रुपयांत प्रतिदिन 0.5GB डेटा, १०० SMS प्रतिदिन
· २८ दिवसांसाठी १३९ रुपयांत, प्रतिदिन 1.5 GB डेटा. 100 SMS प्रतिदिन
· ३० दिवसांसाठी 10 GB डेटा
· १८४ ते १८७ रुपयांमध्ये तुम्हांला २८ दिवसांसाठी इतर सुविधांसह 1 GB डेटा मिळेल.
· ७५ दिवसांसाठी ३१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल
· ५६ ते ८४ दिवसासांठी प्रतिदिन 2 ते 12 GB डेटा, तसेच SMS सुविधा आहेत.
· वरील सर्व रिचार्ज प्लान्सवर अनलिमिटेड व्हॉईस कॉल फ्री आहेत.
अनलिमिटेड प्लॅन म्हणजे काय जाणून घेऊ;
सध्या सगळ्याच टेलिकॉम कंपन्या अनलिमिटेड प्लॅन देऊ लागल्या आहेत. अनेकांना अनलिमिटेड म्हणजे काय माहिती नसते त्यामुळे ते चुकीचा प्लॅन घेतात, कधी कधी तर गरज नसताना वेगळाच प्लॅन घेतात ज्यामध्ये त्यांचे पैसे फुकट जातात. अनलिमिटेड म्हणजे तो प्लॅन आपल्या मोबाईल फोनमध्ये ऍक्टिवेट केल्यानंतर किंवा एखाद्या ठारावीक प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर तुम्ही कितीही बोलू शकता. इतर रिचार्ज प्लॅनमध्ये प्रत्येक मिनिटाला पैसे कट होत असतात, परंतु इथे तसं नसतं. त्यामुळे अनेकांना अनलिमिटेड प्लॅन जास्त सोयीचे पडतात. BSNL unlimited Recharge plan