LIC Jeevan Anand: दररोज 45 रुपये जमा केल्यास इतक्या वर्षांनी मिळतील 25 लाख! LIC ची ही योजना जाणून घ्या आणि लखपती व्हा!!!

भारतीय आयुर्विमा महामंडळ ही भारतातील शासकीय विमा कंपनी आहे. Life insurance corporation म्हणजे LIC कुटुंबातील प्रत्येक वयोगटासाठी पॉलिसी ऑफर करते. म्हणूनच तर LIC च्या विविध योजना लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आर्थिक सुरक्षितता मिळेल या हेतूने चालविण्यात येतात. विम्याच्या पॉलिसी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांना संरक्षण आणि हमी परतावा देतात. LIC च्या अशा बऱ्याच योजना आहेत ज्यामध्ये अगदी कमी रक्कम गुंतवून मोठा निधी जमा करता येतो. अशीच एक योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ती म्हणजे LIC ची जीवन आनंद पॉलिसी. या पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज फक्त 45 रुपये वाचवून 25 लाख रुपये मिळवू शकता. चला तर मग ही गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची, याचे फायदे कोणकोणते आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या लेखाच्या माध्यमातून मिळवूया. LIC Jeevan Anand

LIC Jeevan Anand
LIC Jeevan Anand

कमी प्रिमियमध्ये मोठा नफा

नागरिकांना जर कमी प्रीमियम भरुन जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल LIC ची जीवन आनंद पॉलिसी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.  एक प्रकारे याला टर्म पॉलिसी असेही  म्हटले जाते. पॉलिसी पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेत प्रीमियम भरू शकता. जीवन आनंद पॉलिसीमध्ये 1 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते, यामध्ये कोणतीही कमाल मर्यादा नाही. LIC Jeevan Anand

अधिक वाचाआयो ! एकदाच प्रिमियम, आयुष्यभर पेन्शन !! LIC च्या या प्लॅन बद्दल वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

अल्प बचतीमध्ये चौपट फायदा मिळवा

LIC जीवन आनंद पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारकाला दररोज केवळ 45 रुपये जमा करायचे असतात, एकत्रितपणे एका महिन्यातला 1358 रुपये देखील जमा करता येतात. अशा पद्धतीने वर्षभरात 16,300 रुपये जमा केले जातात. पॉलिसीधारकाला ही रक्कम दीर्घ मुदतीसाठी दरमहा जमा करावी लागते. पॉलिसीची मुदत 15 ते 35 वर्षे इतकी आहे.

दरदिवशी 45 रुपये वाचवून 35 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यानंतर पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर पॉलिसीधारकाला 25 लाख रुपये मिळतील. म्हणजे भरलेल्या रकमेच्या चारपट पैसे परत मिळतात.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

वार्षिक बचतीतील रक्कम पाहिली तर ती 16300 रुपये होते, असे 35 वर्षांसाठी 5 लाख 70 हजार 500 रुपये होतात आणि LIC Jeevan Anand पॉलिसी धारकाला 35 वर्षांची पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर 25 लाख रुपये देते म्हणजे भरलेल्या रकमेच्या तब्बल चौपट रक्कमेचा परतावा पॉलिसीधारकाला जीवन आनंद पॉलिसीमध्ये मिळतो.

जीवन आनंद पॉलिसीमधील इतर लाभ

जीवन आनंद पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकाला कोणत्याही कर सवलतीचा लाभ मिळत नाही, परंतु यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे रायडर्स मिळतात. यामध्ये अपघाती मृत्यू, अपघात लाभ रायडर, अपंगत्व रायडर, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर यांचा समावेश आहे. मृत्यू लाभामध्ये, नॉमिनीला पॉलिसीचा 125 टक्के मृत्यू लाभ दिला जातो.

Leave a comment