व्हॉट्सऍपवर मेटा AI चे हे आहेत भन्नाट फिचर वापरा आणि तुमचे फोटो सहज एडिट करा

आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, लहानांपासूना मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपले फोटो किंवा आजूबाजूच्या घटनांचे, निसर्गाचे फोटो काढणे फार आवडतात, सध्या तर सोशल मिडियावर प्रत्येकजण सेल्फी किंवा स्वतःचे फॅमिली फोटो शेअर करीत असतात. फोटो काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याचा किंवा शेअर करण्याचा ट्रेंड सध्या खूपच जास्त वाढला आहे. म्हणूनच फ्रि मॅसेजींग ऍप असलेल्या व्हॉट्सॅपने देखील त्याच्या फिचर्समध्ये बदल करीत अपडेटेड व्हॉट्सॅप मेटा AI ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. या  व्हॉट्सऍप मेटा AI च्या मदतीने आपण आता फोटो एडिट करु शकणार आहे. चला तर मग जाणून घेऊ अजून कोणकोणती वैशिष्ट्ये मेटा AI च्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत.

whatsapp ai assisatnt
whatsapp ai assisatnt

फोटो एडिटिंग झाले सोपे

काही दिवसांपूर्वीच मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर Meta AI हे नवीन फीचर लाँच केले आहे. या मेटा AI  ला तुम्हा  चॅट जीपीटीप्रमाणे  कोणताही प्रश्न विचारल्यास तुम्हाला त्याचे उत्तर लिखीत स्वरुपात मिळते. विषय कोणताही असो किंवा पिकनिकचा प्लॅन करायचा असो, मेटा AI वापरकर्त्यांना संदर्भासह स्पष्टीकरण चुटकीसरशी देतो. त्यामध्ये भर म्हणून आता फोटो देखील या मेटा AI च्या मदतीने एडीट करता येणार आहेत. बरेचदा आपण काढलेले फोटो चांगले नसतात, त्यांना योग्य एटिडींगची गरज असते, म्हणजे बॅग्रऊंड बदलणे, फोटो ब्राईट करणे असं बरच काही. आता ही सगळी कामे चुकटीसरशी होणार आहेत तेही व्हॉट्सऍप मेटा AI च्या मदतीने. edit your photo on WhatsApp

फोटोचे बॅकग्राऊंड बदला काही सेकंदात

बरेचदा आपला फोटो खूप छान आलेला असतो परंतु त्याची बॅकग्राऊंड चांगली नसल्याने आपल्याला तो सोशल मिडियावर पोस्ट करता येत नाही. अशावेळी, तुम्हाला अगदी काही सेकंदात तुमच्या फोटोचे खराब बॅग्राऊंड बदलून चांगले ब्रॅकग्राऊंड देता आले तर किती छान होईल ना, तुमच्या फोटोला सोशल मडियावर खूप लाईक्स आणि शेअर देखील येऊ शकतात. मग व्हॉट्सॅप मेटा AIची मदत घेऊन तुम्ही यापुढे तुमच्या फोटोचे बॅग्राऊंड बदलू शकणार आहात. तसेच एखादी इमेज धुरकट असल्यास ब्राईट देखील करता येणार आहे. edit your photo on WhatsApp

व्हॉट्सऍप मेटा AI मल्टीमोडॅलिटीला सपोर्ट करते

व्हॉट्सॲपवरील मेटा एआय कंपनीच्या नवीन व सर्वांत सक्षम लार्ज लँग्वेज जनरेटिव्ह AI मॉडेल Llama 3 वर आधारित आहे; हे मॉडेल मल्टीमोडॅलिटीला सपोर्ट करते त्यामुळे ग्राहकांना नविण्यापूर्ण सुविधा देणे मेटा ला शक्य होत आहे.  तसेच हे AI टेक्स्ट, मजकूर, आवाज, फोटो, आवाजाला प्रतिक्रिया मॅसेज, फोटोसह रिस्पॉन्स किंवा रिप्लायसुद्धा देऊ शकते. व्हॉट्सॲपव्यतिरिक्त मेटाने फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर यांसारख्या इतर लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरही AI मॉडेल सादर केले आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्सचा क्विक रिस्पॉन्स मिळविण्यासाठी विविध सोशल मिडिया ट्रिक्स देखील मेटा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.  तुम्हाला तुमचा फोटो विनामूल्य अत्यंत चांगला एडीट करायचा असल्यास तुम्ही  व्हॉट्सऍपचे AI चॅटबॉटमध्ये वापरू शकता तेही अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने. चला तर मग अपडेट होऊया आणि नवी तंत्रज्ञानप्रणाली आत्मसात करुया! edit your photo on WhatsApp

Leave a comment