आनंदाची बातमी! आता होम लोनवर मिळणार अनुदान, फक्त सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ 

Home Loan | अनेकदा सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यावेळी सामान्य नागरिकांसमोर कर्ज (Loan) काढण्याचा पर्याय समोर येतो. त्यामुळे मग इकडून तिकडून कर्ज मिळते का? कोणत्या बँकेकडून कमी बाजारात कर्ज मिळेल अशी शोधाशोध सुरू होते. परंतु अनेकदा कर्ज मिळण्यासाठी वेळ लागतो. तसेच दुसरीकडे बँका देखील सामान्य नागरिकांना कर्ज देण्यासाठी काहीतरी गहाण टाकायला सांगते. जर तुम्हीही कर्ज काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण तुम्हालाही कर्ज काढायचे असेल तर तुम्ही हे कमी व्याजदराचे कर्ज (Low Interest Rate Loan) काढू शकता. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

केंद्र सरकार सामान्य नागरिकांसाठी देशात पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 राबवत आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरे नागरिकांसाठी तयार केले जाणार आहेत. एकच नाही तर यातील विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबाला 2 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर या अनुदानातून नागरिकांना होम लोन देखील देण्यात येणार आहे. 

पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 चे स्वरूप 

पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 मध्ये देशातील आर्थिक दुर्बल घटक अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या अंतर्गत या गटातील नागरिकांना व्याज अनुदान मिळणार आहे. तसेच यामध्ये अशा नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे देशात कुठेही पक्के घर नाही. 

काय आहे व्याज अनुदान योजना? 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

सामान्य नागरिकांना त्यांनी घेतलेल्या होम लोनवर व्याज अनुदान योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. जर याअनुदानामध्ये 35 लाखापर्यंतचे घर असेल, तर 25 लाखांपर्यंत होम लोन घेणाऱ्या लाभार्थ्याला 12 वर्षांसाठी आठ लाख रुपये व्याज अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान लाभार्थ्यांना ओटीपी किंवा स्मार्ट कार्डच्या माध्यमातून खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासाही मिळणार आहे. तसेच त्यांना घरी बांधणे ही सोपे होणार आहे. 

Leave a comment