Budget 2024: केंद्र सरकारच्या बजेटमध्ये उघडणार खजीना; मध्यमवर्गीयांसाठी असेल ही भेट

केंद्र सरकारने लोकसभा निवडणूकीच्या पुर्वी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आणि 22 जुलै 2024 चे पावसाळी अधिवेशन संसदेत सुरु होईल तेव्हा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला जाईल असे देखील सांगण्यात आले होते. आता ती वेळ आली आहे ज्याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागते होते. या अर्थसंकल्पान मध्यमवर्गीयांसाठी केंद्र सरकार कोणकोणत्या आर्थिक भेटी घेऊन येण्याची शक्यता आहे यावर आज आपण या लेखाच्या माध्यमातून लक्ष टाकणार आहोत.  

अर्थसंकल्पात पुढील घोषणा होण्याची शक्यता

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 चा अतिरिक्त अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी संसदेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा असतील असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. Budget 2024

·      करदात्यांवरील व्याज दर वाढीचा परिणाम कमी करण्यासाठी आयकरात म्हणजेच income tax मध्ये सूट देण्याची शक्यता मांडली जात आहे.

·      इक्विटी गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून कर कपात करण्यात येणार आहे असे मत तज्ञांकडून मांडले जात आहे.

·      टॅक्स स्लॅबमध्ये देखील बदल करण्यात येईल.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      मध्यमवर्गीय व्यक्तींच्या उत्पन्नावरील कराचा बोजा कमी करण्यात येईल.

·      80C मध्ये मिळणारी करातील सूट यावर्षी वाढवण्यात येईल.

·      2014-15 पासून दीड लाखांपर्यंत मिळणारी सूट यावर्षी 2 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहे.

·      पगारदारांना दरवर्षी 40 हजारांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळत असे यावेळी त्याची रक्कम 1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

·      यावर्षीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या HRA नियमांमध्ये दुरुस्ती होण्याची शक्यता तज्ञांकडून मांडली जात आहे.

·      कलम 80TTA ची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. ही मर्यादा 10,000 वरुन 50,000 पर्यंत केली जाऊ शकते.

लोकसभा निवडणूकीच्या पुर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करीत भाजपा सरकारने जनतेला पुढील अर्थसंकल्पामध्ये अधिक चांगल्या घोषणा केल्या जातील असे सांगितले होते. त्यानंतर लोकसभा निवडणूका झाल्या आणि NDA सरकार स्थापन झाले. यावेळी तिसऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. विरोधीपक्षाच्या जागा वाढल्या असल्या तरी NDA त्यांचे पद राखण्यात यशस्वी झाले आहेत. अशी परिस्थितीत असताना आता भारताच्या जनतेला या सरकारकडून एका चांगल्या आणि सर्वसामान्यांना लाभदायक ठरेल अशा अर्थसंकल्पाची अपेक्षा आहे. उद्या 23 जुले 2024 रोजी आपल्याला समजेल की नक्की कोणकोणत्या नव्या घोषणा केंद्र सरकार करणात आहे. Budget 2024

Leave a comment